Prithvi Shaw 200 Runs Dainik Gomantak
देश

Prithvi Shaw Double Century : 34 चौकार, 5 षटकार... पुन्हा एकदा 'शॉ' टाईम! पृथ्वीच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा वर्षाव, 140 चेंडूत झळकावलं द्विशतक

Prithvi Shaw Double Century In Ranji Trophy : महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफीचा पहिला हंगाम खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या दुसऱ्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sameer Amunekar

महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफीचा पहिला हंगाम खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या दुसऱ्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. उजव्या हाताच्या या आक्रमक सलामीवीराने चंदीगडविरुद्ध फक्त १४१ चेंडूत द्विशतक (२२२ धावा) झळकावत मैदानावर धुमाकूळ घातला. त्याच्या या खेळीमध्ये ३४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. इतकंच नव्हे, तर त्याचा स्ट्राईक रेट १४२ पेक्षा जास्त होता.

शॉसाठी हे शतक विशेष ठरलं आहे, कारण हे महाराष्ट्रासाठीचं त्याचं पहिलं प्रथम श्रेणी शतक आहे. यापूर्वी तो मुंबईकडून रणजी खेळत होता, मात्र निवड समितीशी मतभेद आणि सततच्या अपयशानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर त्याने महाराष्ट्राचा संघ गाठला आणि आता या द्विशतकाने त्याने आपल्या नव्या संघाचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला शॉ चंदीगडविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त ८ धावा करून बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने गोलंदाजांना अक्षरशः धुवून काढलं. चंदीगडचा प्रत्येक गोलंदाज त्याच्या आक्रमणासमोर हतबल झाला. निशांक बिर्लाविरुद्ध त्याने ४० चेंडूत ५७ धावा, तर जगजीत संधूविरुद्ध २० चेंडूत ४४ धावा ठोकल्या. सैनी, राजनगड बावा आणि विशू या सर्व गोलंदाजांना त्याने आपल्या प्रहारांनी गारद केलं.

एक वेळ अशी होती की शॉ त्रिशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचेल असं वाटत होतं, मात्र अर्जुन आझादच्या चेंडूवर तो बाद झाला. तरीसुद्धा त्याची २२२ धावांची खेळी महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरली.

पृथ्वी शॉ गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म आणि फिटनेसच्या प्रश्नांमुळे चर्चेत होता. अलीकडेच त्याचा मुशीर खानसोबत झालेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी त्याच्या वृत्तीवर आणि शिस्तीवर टीका केली होती. पण आता चंदीगडविरुद्ध केलेल्या या झंझावाती द्विशतकाने शॉने आपल्या सर्व टीकाकारांना गप्प केलं आहे.

महाराष्ट्र संघासाठी आणि स्वतःसाठीही ही खेळी पुनरागमनाचं प्रतीक ठरली आहे. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात आता सगळ्यांच्या नजरा पुन्हा पृथ्वी शॉवर खिळल्या आहेत. कारण हा तरुण फलंदाज पुन्हा एकदा “कमबॅक किंग” म्हणून ओळख मिळवू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT