Prime Minister Narendra Modi's visit to Varanasi inaugurates work worth Rs 1,500 crore Dainik Gomantak
देश

नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेश दौरा, निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधानांचं मोठं गिफ्ट

सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मोदी वाराणसी विमानतळावर पोहचतील सुमारे 8 महिन्यांनंतर पीएम मोदी(Narendra Modi) वाराणसीत येणार आहेत

Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आज आपल्या लोकसभा मतदार संघ वाराणसीला(Varanasi) भेट देतील आणि 1500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करणार आहेत. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) होणार्‍या विधानसभा निवडणुका(Uttar Pradesh Assembly Election 2020) लक्षात घेता मोदींचा हा वाराणसी दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी काही जाहीर सभांना ही संबोधित करणार आहेत म्हणून ही भेट भाजपच्या(BJP) विधानसभा निवडणुकांच्या मोहिमेची सुरूवात म्हणूनही पाहिली जात आहे.

या आपल्या दौऱ्यात नरेंद्र मोदी अनेक विकास कामांचे तसेच अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील ज्यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) 100 बेडच्या एमसीएच शाखेसह गोदौलिया येथील बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदीच्या पर्यटन विकासासाठी रो-रो बोटी व वाराणसी-गाजीपूर महामार्गावरील तीन लेन उड्डाणपुलासह विविध सार्वजनिक प्रकल्प व सुरू होणाऱ्या कामांचा समावेश आहे.

या दरम्यान सुमारे 744 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार असून पंतप्रधान सुमारे 839 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे आणि सार्वजनिक कामांचे शिलान्यास देखील करणार आहेत.ज्यामध्ये यामध्ये सेंट्रल फॉर स्किल अँड टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) तसेच जल जीवन मिशन अंतर्गत 143 ग्रामीण प्रकल्प आणि कारखियांव येथील आंबा आणि भाजीपाल्यासाठी एकात्मिक पॅक हाऊसचा समावेश आहे.

दुपारी 12:15 वाजता पंतप्रधान मोदी जपानच्या मदतीने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय को ऑपरेशन अँड कन्व्हेन्शन सेंटर - रुद्राक्षचे उद्घाटन करतील. तसेच यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास ते बीएचयूच्या मातृ व बाल आरोग्य विभागाची पाहणी करतील. त्याचबरोबर कोविड -१९ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी अधिकारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांशीही भेट घेणार आहेत.

सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास मोदी वाराणसी विमानतळावर पोहचतील सुमारे 8 महिन्यांनंतर पीएम मोदी वाराणसीत येणार आहेत आणि ते संपूर्ण 5 तास वाराणसीतच असणार आहेत म्हणूनच 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT