Covid-19: केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करण्याचे दिले आदेश

राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) पत्र पाठवून कोरोनाचे निर्बंध पाळण्याचे आदेश दिले आहेत. तर कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या एसओपी लागू करण्यास सांगितले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेचा (third wave) धोका मात्र कायम आहे. लोकांची सार्वजनिक ठिकाणी (public places) , पर्यटनस्थळी (Tourist spot) , बाजारपेठांमध्ये (markets), कार्यक्रमांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यांना पुन्हा निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्र पाठवून कोरोनाचे निर्बंध पाळण्याचे आदेश दिले आहेत. तर कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या एसओपी लागू करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारपेठांमध्ये होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोण जर बेजबाबदारपणे वागत असेल तर परिस्थितीनूसार त्याच्यावर कारवाई करण्यासचे निर्देश देखील गृहमंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकारांना ही पत्र पाठविली आहेत. यात सांगण्यात आले आहे की, ज्या ठिकाणी नियम पाळले जाणार नाहीत तेथे पुन्हा लॉकडाऊन लावावे. पर्यटकांच्या गर्दीबाबत देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर केंद्र शासनाने निर्बंधांमध्ये सूट दिली होती. मात्र अनेक भागात या नियमांचे उल्लंघन होत असलेले आपल्याला पहावयास मिळाले आहे.

यामध्ये सार्वजनिक वाहतूक आणि हिल स्टेशन, बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. सोशलडिस्टन्सिंग, मास्क याकडे लोक दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाचे नियम न पळता लोक घराबाहेर फिरत आहेत. ही चिंतेची बाब आहे. असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com