देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये (Britain) होणाऱ्या जी-7 शिखर (G7Summit) परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.(Prime Minister Narendra Modis G7 tour canceled)
ब्रिटनमधील कॉर्नवॉल (Cornwall) येथे 11 ते 13 जून या कालावधीत होणाऱ्या जी-7 देशांची शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रण दिले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान जी-7 शिखर परिषदेसाठी जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.