Goa CM Dr. Pramod Sawant In karnataka Election campaigning Dainik Gomantak
देश

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटकात निवडणूक प्रचाराचा ‘सुपर संडे’

शिमोग्गा, बंगळुरूत रोड शो : परस्परविरोधी टीकांमुळे राजकीय वातावरण निघाले ढवळून

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Election कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार रविवारी शिगेला पोहोचला. प्रचाराची सोमवारी सांगता होणार असल्याने, भाजप, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल या प्रमुख पक्षांसह सर्वांनीच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमोग्गा येथे सभा आणि बंगळुरात रोड शो घेतला; तर प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी प्रचार करत भाजपवर टीकास्त्र सोडल्याने राजकीय वातावरण तापले होते.

दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याची कर्नाटकात गेल्या 38 वर्षांपासूनची प्रथा आहे. ती मोडून काढण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर या महत्त्वाच्या राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसने बाजी लावली आहे.

...म्हणून सोनियांना बोलावले

‘पराभवाच्या भयानेच काँग्रेसने सोनिया गांधी यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावून घेतले,’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमोग्गा येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेसला हाणला.

जनतेने काँग्रेसचा खोटारडेपणाचा फुगा फोडला असल्याने भाजपचाच विजय होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचार, बेरोजगारी हाच खरा दहशतवाद : प्रियांका :

‘‘दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि धर्म याविषयी पंतप्रधान बरेच बोलत आहेत. परंतु कर्नाटकातील जनतेला भेडसावत असलेल्या वास्तवातील समस्यांना त्यांनी स्पर्शही केला नाही. 40 टक्के दलाली, भ्रष्टाचार हा कर्नाटकातील खरा दहशतवाद आहे,’’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT