Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

''प्रधानमंत्री संग्रहालय देशाच्या भावी पिढीला प्रेरणा देणार''

आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नव्याने बांधलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले.

दैनिक गोमन्तक

आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नव्याने बांधलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी संग्रहालयाला भेट देण्यासाठी पहिले तिकीटही खरेदी केले आहे. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असणारे हे संग्रहालय 15,600 चौरस मीटर परिसरात सुमारे 217 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. देशाच्या 14 पूर्व पंतप्रधानांचे जीवन आणि त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती या संग्राहालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसेच या संग्रहालयाच्या माध्यमातून स्वतंत्र भारतातील (India) सर्व सरकारांचे कामकाज आणि देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या (Democracy) इतिहासाचे चित्रण रेखाटण्यात आले आहे. (Prime Minister Narendra Modi said The Prime Minister's Museum will inspire future generations of the country)

बाबासाहेबांच्या पंचतीर्थांचा विकास करणे हे आमच्या सरकारचे भाग्य: पंतप्रधान मोदी

आपल्या सरकारचे भाग्य आहे की, दिल्लीत आपल्याला बाबासाहेबांचे अलिपूर रोड वर महापरिनिर्वाण स्थळी स्मारक उभारु शकले. बाबासाहेबांनी विकसित केलेली पंचतीर्थे ही सामाजिक न्यायाची आणि अतूट राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारी केंद्रे आहेत.

आपली लोकशाही आपल्याला नवोपक्रम स्वीकारण्याची प्रेरणा देते: पंतप्रधान मोदी

आपण त्या सभ्यतेचे आहोत ज्यामध्ये असे म्हटले आहे - आ न भद्रः कृतवो यांतु विश्वथा, याचा अर्थ, सर्व बाजूंनी चांगले विचार आपल्यात येऊ दे! आपली लोकशाही आपल्याला नवकल्पना स्वीकारण्याची प्रेरणा देते.

लोकशाही बळकट करणे हाच आपला हेतू

काही अपवाद वगळता लोकशाही मार्गाने लोकशाही बळकट करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करणे ही आपलीही जबाबदारी आहे.

प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत, भारताला सशक्त करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आला

भारत ही लोकशाहीची जननी आहे. भारताच्या लोकशाहीचे वैशिष्टय हे आहे की, त्यात काळाच्या ओघात सातत्याने बदल होत आहेत. प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत लोकशाहीला अधिक आधुनिक, सशक्त बनवण्याचा सतत प्रयत्न होत आला आहे.

आपले बहुतेक पंतप्रधान अतिशय साध्या कुटुंबातून आले आहेत: पंतप्रधान मोदी

प्रधानमंत्री संग्रहालयात जेवढा भूतकाळ आहे, तेवढाच भविष्यकाळ आहे. हे संग्रहालय देशातील जनतेला भारताच्या विकासाचा प्रगतीपथ दाखवेल. विशेष म्हणजे एका दशकातील भारताच्या प्रगतीचा आलेख या संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे जनतेला एका नव्या दिशेने विकास करण्याची प्रेरणा मिळेल. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की, आपले बहुतेक पंतप्रधान हे अगदी साध्या कुटुंबातून आलेले आहेत. दुर्गम ग्रामीण भागातून येणे, अत्यंत गरीब कुटुंबातून येणे, शेतकरी कुटुंबातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणे हे भारतीय लोकशाहीच्या महान परंपरेवरील विश्वास दृढ करतो.

पीएम म्युझियममध्ये येताना माजी पंतप्रधानांचे योगदान लोकांसमोर येईल

संविधानिक लोकशाहीच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाचे मोठे योगदान आहे. त्यांचे स्मरण करणे म्हणजे स्वतंत्र भारताचा प्रवास जाणून घेणे होय. इथे येणार्‍या लोकांना देशाच्या पूर्व पंतप्रधानांच्या योगदानाची माहिती होईल. तसेच त्यांच्या संघर्षाची आणि विशेष म्हणजे त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती मिळेल.

सर्वच पंतप्रधानांनी आव्हानांवर मात करुन देशाला इथपर्यंत आणले

देशाच्या प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या काळातील विविध आव्हानांवर मात करुन देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व, सर्जनशीलता, नेतृत्व असे वेगवेगळे आयाम असतात. देशातील जनतेला, विशेषत: तरुणांना, भावी पिढ्यांना सर्व पंतप्रधानांची माहिती मिळाली, तर त्यांना प्रेरणा मिळेल.

आज देश ज्या उंचीवर आहे, त्या उंचीवर नेण्यात प्रत्येक सरकारचे योगदान

स्वतंत्र भारतानंतर स्थापन झालेल्या प्रत्येक सरकारने देशाला आज ज्या उंचीवर नेण्यात योगदान दिले त्यांना मी वंदन करतो. विशेष म्हणजे ही गोष्ट मी लाल किल्ल्यावरुनही अनेकदा सांगितली आहे. आज हे संग्रहालय प्रत्येक सरकारच्या सामायिक वारशाचे जिवंत प्रतिबिंब बनले आहे.

मी देशवासियांना सर्व सणांच्या शुभेच्छा देतो: पंतप्रधान मोदी

बैसाखी, बिहू, ओडिया नववर्षही आजपासून सुरु होत आहे. आपले तामिळनाडूचे बंधू-भगिनीही नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. याशिवाय अनेक भागात नवीन वर्ष सुरु होत असून, अनेक सण साजरे केले जात आहेत. मी देशवासियांना सर्व सणांच्या शुभेच्छा देतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT