देशाच्या संविधानाचे शिल्पकार भीमराव आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म या दिवशी म्हणजेच 14ए प्रिल 1891 रोजी झाला होता. कधी कधी हा महामानव कसा जन्माला आला, बाबासाहेबांना देशात एवढं मोठ परिवर्तन घडवून आणण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली, भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा अनुसुचीत जातीचे स्वातंत्र्य बाबासाहेबांना महत्वाचे का वाटले? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासाठी बाबासाहेब वाचणे गरजेचे आहे. कारण त्यांनी जगाला 'वाचाल तर वाचाल' असा संदेश दिला आहे.
डॉ भीमराव आंबेडकर कोण होते?
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या फळीचे नेते, ज्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. आंबेडकर लहानपणापासूनच हुशार आणि संघर्षशील होते. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते.
आंबेडकरांचा जन्म कधी आणि कुठे झाला?
आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू शहरात झाला. विशेष म्हणजे 2003 मध्ये या शहराचे नाव महूवरून बदलून डॉ. आंबेडकर नगर असे करण्यात आले. त्यांचे कुटुंब मूळचे मराठी आणि धार्मिकदृष्ट्या कबीरपंथी होते.
आंबेडकरांचा शैक्षणिक प्रवास
भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. आंबेडकर यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात सातारा नगर येथील राजवाडा चौकात असलेल्या शासकीय हायस्कूलमध्ये इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेऊन झाली. 1997 मध्ये, त्यांचे कुटुंब मुंबईला गेले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण पुन्हा मुंबईच्या एल्फिन्स्टन रोडवरील सरकारी हायस्कूलमध्ये झाले. आंबेडकरांचे उच्च शिक्षण बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून सुरू झाले, तेथून त्यांनी बॅचलर डिग्री मिळवली.1913 मध्ये आंबेडकर अमेरिकेला गेले आणि तिथल्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेनंतर ते लंडनला गेले आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये "इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया" या विषयावर संशोधन कार्य केले, त्यासाठी त्यांना अर्थशास्त्रात पीएचडी मिळाली.
आंबेडकरांनी कोणती पुस्तके लिहिली ?
आंबेडकर त्यांच्या काळातील सर्व राजकारण्यांपेक्षा अधिक वाचन करणारे नेते होते. अकरा वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असलेल्या आंबेडकरांनी एकूण 32 पुस्तके, 10 विधाने आणि चार संशोधन प्रबंध तसेच अनेक पुस्तकांची समीक्षा लिहिली आहे.
त्यांची 'भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ', द प्रॉब्लेम ऑफ द रुपी: इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन इत्यादी पुस्तके महत्त्वाची आहेत. त्यांच्या लेखन क्षमतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, आज "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" चे 22 भाग प्रकाशित झाले आहेत, तरीही त्यांच्या लेखनाचे प्रकाशन व संकलन करण्याचे काम सुरू आहे.
आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार का म्हटले गेले?
आंबेडकर भारताच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी परिचित होते. त्यांना परस्पर संबंध नसलेल्या विषयांचेही ज्ञान होते. कायदा, अर्थशास्त्र या विषयांची जाण असलेल्या बाबासाहेबांनी जगातील सर्व लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. भारतासाठी सर्वसमावेशक आणि प्रभावी राज्यघटना तयार करण्यासाठी ते तत्कालीन सर्वात सक्षम व्यक्तीमत्व होते. त्यामुळे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम त्यांना दिले गेले आणि आज जगातील सर्वात शास्त्रोक्त संविधान आपल्या देशात बाबासाहेबांनी लिहून ठेवले आहे.
दलित उत्थानाबद्दल आंबेडकरांचे मत?
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांनी त्यांच्या ‘हू वेअर द शूद्र’ या प्रसिद्ध पुस्तकात दलितांच्या समस्यांवर लेख लिहिले आहेत. समतेबरोबरच त्यांनी आरक्षणाच्या व्यवस्थेचाही पुरस्कार केला.
आंबेडकरांचे सामाजिक जीवन कसे होते?
आंबेडकरांचे सामाजिक जीवन अत्यंत साधे होते. आंबेडकर हे उच्च शिक्षित आणि साधेसुधे स्वभावाचे होते. सामाजिक समस्यांकडे त्यांचा दृष्टिकोन वास्तववादी होता.
आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची कारणे कोणती होती?
अस्पृश्यतेसारखा सामाजिक आजार हिंदूंमध्ये आहे. आणि हा मतभेद मिटवण्यासाठी बौद्ध धर्माचा अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि याचत त्यांना अस्पृश्यांना न्याय देण्याचा मार्ग सापडला त्यामुळेच आंबेडकरांनी इस्लाम ऐवजी बौद्ध धर्माची निवड केली. आणि दिक्षा भूमिवर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
आंबेडकरांचा मृत्यू कसा झाला?
6 डिसेंबर 1956 रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आंबेडकरांचे निधन झाले. हा काळ भारतासाठी अत्यंत कठीण होता. जेव्हा देशाच्या शिल्पकाराने शेवटचा श्वास घेतला तेव्हा समस्त जनसमुदाय रडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.