Prime Minister Narendra Modi: India's vaccination program is best example of 'Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas' Twitter @ANI
देश

"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास " याचं जिवंत उदाहरण म्हणजे लसीकरण: पंतप्रधान

पंतप्रधान मोदींनी या संबोधनात देशाने जो लसीकरणाचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल130 करोड देशवासीयांचे अभिनंदन करत हे यश म्हणजे भारताचे यश असल्याचे सांगितले.

दैनिक गोमन्तक

देशाने कालच 100 कोटी लसीचे डोस (Vaccination) देण्याचा टप्पा पार करत एक भीमविक्रम निर्माण केला आहे. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधन केले आहे .पंतप्रधान मोदींनी या संबोधनात देशाने जो लसीकरणाचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल130 करोड देशवासीयांचे अभिनंदन करत हे यश म्हणजे भारताचे यश असल्याचे सांगितले. तसेच हा केवळ आकडा नसून देशाचे सामर्थ्य तसेच नव्या भारताची नवी ओळख असल्याचे पंतप्रधांनांनी सांगितले आहे. (Prime Minister Narendra Modi: India's vaccination program is best example of 'Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas')

भारत आतापर्यंत महामारीच्या काळात इतर देशांवर अवलंबुन होता आणि त्यामुळेच कोरोना महामारी आल्यानंतर अनेक देशांनी भारताच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मात्र लसिकरणाटा टप्पा गाठून भारताने हे साध्य केल्याने सर्वांनाच प्रितिउत्तर उत्तर मिळाले

लसीकरणाचं हे उदाहण म्हणजे "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास " याचं जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी या संबोधनात सांगितले आहे.

देशाने आपली एकता दाखवण्यासाठी टाळी, थाळी वाजवून दिवे लावले त्यावरूनही अनेकांनी आपल्यावर टीका केली मात्र आपण लढतच राहिलो आणि आज आपण इथपर्यंत आलो आहे. तसेच देशाने केलेला वॅक्सिन ड्राईव्ह म्हणजे विज्ञानाचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले आहे.कोवीन ऍपने खूप मोठे काम केलं आणि त्याचेच कौतुक जगभरातून होत आहे.

त्याचबरोबर लसीकरणामुळं देशात अनेक परदेशी गुंतवणूकदार येत आहेत त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. आणि या साऱ्या लसीकरणामुळं अर्थव्यवस्थेत उत्साहाचं वातावरण आहे. त्यातच आपण आणलेली गती शक्ती योजना देखील अर्तव्यवस्थेला चालना देणारी ठरणार असल्याचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

आपण साऱ्यांनी मिळून प्रयत्न केला तर कोरोनाला नक्की हरवू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT