पंतप्रधान नरेंद्र मोदीं साधणार देशवासीयांशी संवाद

पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात कोविड (COVID-19) लसीकरणाबाबत देशाच्या अथक प्रयत्नांविषयी चर्चा होऊ शकते.
Prime Minister Narendra Modi will address the nation at 10 am
Prime Minister Narendra Modi will address the nation at 10 am Dainik Gomantak

देशाने कालच 100 कोटी लसीचे डोस (Vaccination) देण्याचा टप्पा पार करत एक भीमविक्रम निर्माण केला आहे. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणात कोविड (COVID-19) लसीकरणाबाबत देशाच्या अथक प्रयत्नांविषयी चर्चा होऊ शकते. यासह, पंतप्रधान कोविडशी संबंधित आव्हानांविषयी देशवासियांना संबोधित करू शकतात. पंतप्रधान मोदी आज रात्री 10 वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. (Prime Minister Narendra Modi will address the nation at 10 am)

भारताने कोविडविरोधी लसीकरणाचा 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्याने गेल्या 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या जागतिक साथीचा सामना करण्यासाठी देशाकडे आता एक मजबूत संरक्षण कवच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले आहे. पंतप्रधान मोदींनी लसीकरणाच्या या कामगिरीला भारतीय विज्ञान, उद्यम आणि 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय म्हणून संबोधले आहे याच पार्शवभूमीवर काल पंतप्रधानांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगार आणि लसीकरण करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला.

पंतप्रधान म्हणाले की, "21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदवला गेला आहे. भारताने आज लसींचे 100 कोटी डोस देण्याचा आकडा पार केला.आणि हे भारताचे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे यश आहे."

Prime Minister Narendra Modi will address the nation at 10 am
भारताने लसीकरणात गाठला 100 कोटींचा आकडा, देशभरात 'लसोत्सव' !

"भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. लसीकरणात 100 कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार. ”अशा अश्याच ट्विट करत पंतप्रधानांनी काल संपूर्ण देशाचे आभार मानले होते.

त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com