PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान मोदींनी मुस्लिम बांधवांना दिल्या 'रमजान' पवित्र महिन्याच्या शुभेच्छा

रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे, त्यात रविवारी म्हणजेच आज रमजानचा पहिला उपवास आहे.

दैनिक गोमन्तक

रमजानचा (Ramadan) पवित्र महिना सुरू झाला आहे, त्यात रविवारी म्हणजेच आज रमजानचा पहिला उपवास आहे. शनिवारी एक दिवस आधी चंद्र दिसून आला. रमजानचा चंद्र दिसल्यापासून लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यास सूरुवात करतात. मोदींनीही लोकांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. समाजातील लोकांना शांती, सौहार्द आणि करुणेची भावना विकसित करण्याची शक्ती मिळावी, अशी सदिच्छा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. 2 एप्रिलला चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी 3 एप्रिलपासून उपवास धरण्यास सुरूवात केली आहे. शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या पवित्र महिन्यात गरिबांची सेवा करण्यासाठी लोकांना प्रेरणा देण्याचे बळ मिळो. (Prime Minister Modi wished the Muslim Brotherhood a Happy Ramadan)

पंतप्रधान मोदींनी रमजानच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट केले की, “पवित्र रमजान महिन्याच्या सनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. रमजानच्या या महिन्यात लोकांना गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळो. तसेच, हा पवित्र महिना आपल्या समाजात शांती, सौहार्द आणि करुणेची भावना जागृत करेल.

2 एप्रिलला दिसला चंद्र

रमजान हा उपवास, प्रार्थना आणि चिंतनाचा महिना असून मुस्लिमांकडून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. देशात 2 एप्रिलला चंद्रदर्शन झाल्यानंतर आता मुस्लिम समाजाचे लोक रविवार, 3 एप्रिलपासून रोजा ठेवायला सुरुवात करणार आहेत. रमजानच्या संदर्भात असे मानले जाते की रमजानच्या पवित्र महिन्यात प्रेषित मुहम्मद यांना अल्लाहकडून कुराणचे पहिले श्लोक मिळाले होते आणि म्हणून या पवित्र दिवशी उपवास ठेवला जातो. दिवसभर उपाशी व तहानलेले राहून देवाची पूजा करून गरजू लोकांची सेवा केली जाते, 3 एप्रिलपासून सुरू होणारा रमजान ईद 1 मे रोजी संपणार आहे. पण त्याची रमजानची तारीख चंद्रदर्शनानंतरच ठरते.

दिवसभर भुकेने तहानलेल्या राहून अल्लाहची उपासना करणे

इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे सेवन केले जाते, त्याला सहारी म्हणून देखील ओळखले जाते, तर सेहरीची वेळ अगोदरच ठरलेली असते. यानंतर दिवसभर उपाशी आणि तहानलेले राहून अल्लाहची पूजा केली जाते, त्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केल्यानंतर उपवास सोडला जातो, तर त्याला इफ्तार म्हणून ओळखले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT