Tina Dabi and Athar Amir Khan
Tina Dabi and Athar Amir KhanDainik Gomantak

IAS टीना डाबींच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, पूर्वाश्रमीचे पती अतहर सध्या काय करतात?

यूपीएससी टॉपर टीना डाबी दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार

आयएएस अधिकारी आणि 2015 च्या यूपीएससी टॉपर टीना डाबी दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार आहेत. राजस्थान पुरातत्व खात्याचे संचालय प्रदीप गवांडे यांच्याशी टीना डाबी यांचं लग्न होणार असून या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या पहिल्या लग्नाच्य घटस्फोटाला 7 महिने पूर्ण होतात न होतात तोच त्यांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आली आहे. याचदरम्यान टीना डाबी यांचे पूर्वाश्रमीचे पती आणि आयएएस अधिकारी अतहर अमीर खानही पुन्हा चर्चेत आले आहेत. घटस्फोटानंतर ते सध्या काय करतात असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Tina Dabi and Athar Amir Khan
युध्दापूर्वी रशियाकडून होणाऱ्या युरोपच्या तेल खरेदीत मोठी वाढ, नेमकं कारण काय?

टीना डाबी यांचे पूर्वाश्रमीचे पती अतहर अमीर खान सध्या काश्मीरमध्ये (Kashmir) कार्यरत आहेत. ते सध्या श्रीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी काम करत असून श्रीनगर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. अतहर आमिर खान हे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. इंस्टाग्रामवर तर त्यांचे फॉलोअर्स साडेपाच लाखांहूनही जास्त आहेत, तर 1 लाखांहून अधिक लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. फेसबुकवरही त्यांना 1.7 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते स्वत:बद्दल आणि आपल्या कामाबद्दल पोस्ट करत असतात.

29 वर्षीय अतहर मूळचे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी IIT मंडी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यूपीएससी (UPSC) परीक्षेत 560 वा क्रमांक मिळाला. मात्र आपला रँक सुधारण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा 2015 साली युपीएससी परीक्षा दिली. 2015 मध्ये यूपीएससी परीक्षेत अतहर यांना दुसरा रँक मिळाला होता, तर पहिल्या क्रमांकावर टीना डाबी होत्या. पहिला क्रमांक मिळवत टीना 2015 साली यूपीएससी टॉपर ठरल्या होत्या.

Tina Dabi and Athar Amir Khan
AFSPA कायदा म्हणजे काय? त्याची गरज का होती अन् सरकारने कोणता दिलासा दिला

प्रशिक्षणादरम्यान टीना डाबी आणि अतहर आमिर यांच्यात प्रेमसंबंध जुळले आणि 2018 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच नजरेत प्रेम जुळल्याचं म्हणणाऱ्या टीना डाबी यांचं अतहर यांच्याशी फार काळ जुळलं नाही आणि त्यांच्या नात्यात तणाव वाढू लागला. सर्वात आधी टीना डाबी यांनी आपल्या नावासमोरील खान आडनाव काढून टाकलं. यानंतर अतहर यांनीही टीना यांना इन्स्टाग्रामवरुन (Instagram) अनफॉलो केलं. 2020 मध्ये दोघांमधील तणाव इतका शिगेला गेला की त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. ऑगस्ट 2021 मध्ये टीना आणि अतहर यांचा घटस्फोट मंजूर झाला होता.

अतहर आपल्या कामासाठी प्रसिद्ध असून त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. नुकत्याच स्मार्ट सिटी पुरस्कार 2022 मध्ये श्रीनगर स्मार्ट सिटीला बेस्ट सीटी लीडर ऑफ द इअर या पुरस्काराने (Award) अतहर यांना गौरवण्यात आलं आहे. याआधी समाजसेवेसंबंधित कामासाठी 2020 मध्ये IIT मंडीकडून त्यांचा यंग अचिव्हर्स अवॉर्डने सन्मान करण्यात आला होता. 2019 मध्येही भीलवाडामध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com