Prime Minister Modi used to compare Former RBI Governor Urjit Patel with a snake, reveals a senior officer in a book. Dainik Gomantak
देश

RBI च्या माजी गव्हर्नरची पंतप्रधान मोदी करायचे सापाशी तुलना, बड्या माजी अधिकाऱ्याचा पुस्तकातून खुलासा

'पीएम मोदी त्यांना कंटाळले होते. एकदा ते रागाने म्हणाले, पैशाच्या ढिगाऱ्यावर एक साप बसला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर हे पैसे सरकारला वापरू देत नसल्याचा त्याचा संकेत होता.

Ashutosh Masgaunde

Prime Minister Modi used to compare Former RBI Governor Urjit Patel with a snake, reveals a former senior officer in a book:

माजी अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी त्यांच्या 'वुई ऑल्सो मेक पॉलिसी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठा खुलासा केला आहे.

माजी वित्त सचिव गर्ग यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, पीएम मोदींनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना सापाशी केली होती. त्यांनी लिहिले की, पीएम मोदी म्हणाले की, उर्जित पटेल हा साप आहे, जो नोटांच्या ढिगाऱ्यावर गुंडाळून बसला आहे.

गर्ग यांच्या पुस्तकात त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उर्जित पटेल यांच्यातील तणावाविषयी लिहिले आहे. उर्जित पटेल यांच्याबद्दल नरेंद्र मोदींची निराशा फेब्रुवारी 2018 मध्ये आणखी वाढली, जेव्हा आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केंद्र सरकार राष्ट्रीयीकृत बँकांवरील नियामक अधिकार काढून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

सुभाष गर्ग यांनी त्यांच्या पुस्तकात उर्जित पटेल यांनी केंद्र सरकारच्या इलेक्टोरल बाँड योजनेत छेडछाड किंवा संपवण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला आहे.

पटले यांचे मत होते की, इलेक्टोरल बॉण्ड्स फक्त आरबीआय जारी करेल आणि ही सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाईल.

याशिवाय, त्याच वर्षी 2018 मध्ये, RBI गव्हर्नरने रेपो दर 6.25 पर्यंत वाढवला होता, ज्यामुळे सरकारला किमान आधारभूत किंमत वाढवण्यास भाग पडेल. तीन महिन्यांनंतर त्यांनी रेपो रेट 25 टक्क्यांपर्यंत वाढवला, त्यामुळे सरकार दबावाखाली आले आणि लाखो कोटी रुपये बँकांमध्ये जमा करावे लागले.

सुभाष चंद्र गर्ग पुस्तकात पुढे लिहितात, 'पीएम मोदी उर्जित पटेलला कंटाळले होते. एकदा ते रागाने म्हणाले, पैशाच्या ढिगाऱ्यावर एक साप बसला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर हे पैसे सरकारला वापरू देत नसल्याचा त्याचा संकेत होता. गर्ग यांच्या पुस्तकानुसार, पीएम मोदींनी अनेक प्रसंगी उर्जित पटेल यांच्यावर जोरदार टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT