CAR T-Cell Therapy Dainik Gomantak
देश

Cancer Treatment: राष्ट्रपतींनी लॉन्च केली देशातील पहिली स्वदेशी CAR T-Cell थेरपी; कमी खर्चात उपलब्ध होणार कर्करोगावरील उपचार

President Droupadi Murmu: कर्करोग हा जागतिक स्तरावर वेगाने वाढणारा गंभीर आजार आहे, ज्याचा धोका वर्षानुवर्षे वाढत आहे.

Manish Jadhav

Cancer Treatment: कर्करोग हा जागतिक स्तरावर वेगाने वाढणारा गंभीर आजार आहे, ज्याचा धोका वर्षानुवर्षे वाढत आहे. कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे, ज्याबद्दल आरोग्य तज्ञ वेळोवेळी सतर्क करतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणजे वेळेवर निदान आणि उपचारांचा अभाव. देशातील बहुतेक लोकांमध्ये, कर्करोगाचे निदान शेवटच्या टप्प्यात होते, तेथून उपचार करणे आणि रुग्णाचा जीव वाचवणे खूप कठीण होते. भारतातही कर्करोग हा मोठा धोका आहे.

दरम्यान, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे, पवई येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी कर्करोग उपचारासाठी स्वदेशी विकसित CAR T-cell थेरपी लॉन्च केली. आयआयटी बॉम्बे आणि टाटा मेमोरियल सेंटर यांनी विकसित केलेली ही जीन-आधारित थेरपी विविध प्रकारचे कर्करोग बरे करण्यास मदत करेल.

द लॅन्सेट रीजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 2019 मध्ये भारतात जवळपास 12 लाख नवीन कॅन्सरची प्रकरणे आणि 9.3 लाख मृत्यूची नोंद झाली आहे. भारत हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. CAR टी-सेल थेरपीमुळे कर्करोगाच्या उपचारात मदत होऊ शकते, अशी आशा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मेड इन इंडिया थेरपीने कर्करोगावर उपचार

दरम्यान, NexCAR19 CAR टी-सेल थेरपी ही भारतातील पहिली 'मेड इन इंडिया' CAR टी-सेल थेरपी आहे, ज्यामुळे उपचारांच्या खर्चात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि एआयमुळे कर्करोगाच्या उपचारात मोठे यश मिळाले आहे, जरी जास्त किमतीमुळे सामान्य लोकांपर्यंत त्याची उपलब्धता कठीण झाली आहे. मात्र, शास्त्रज्ञांना आशा आहे की या नवीन पद्धतीच्या मदतीने कर्करोगावर उपचार करणे सोपे होईल.

थेरपी 90 टक्के कमी किमतीत उपलब्ध असेल

थेरपीच्या उद्घाटनावेळी, महामहिम राष्ट्रपती म्हणाल्या की, या स्वदेशी थेरपीची किंमत इतरत्र उपलब्ध असलेल्या थेरपीपेक्षा 90 टक्के कमी आहे. ही जगातील सर्वात स्वस्त CAR-T सेल थेरपी आहे. शिवाय, हे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे एक उदाहरण आहे, जे स्वावलंबी भारतासाठी वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आम्हाला आशा आहे की, या थेरपीच्या मदतीने देशाला आगामी काळात कर्करोगाशी लढण्यासाठी बळकटी मिळेल.

कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणात राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, ''मला सांगण्यात आले आहे की ही थेरपी देशभरातील प्रमुख कर्करोग रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना नवीन आशा मिळेल. शिवाय, हा परवडणारा उपचार जगभरातील सर्व रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो. हे "वसुधैव कुटुंबकम्" च्या आमच्या व्हिजनशी सुसंगत असेल. कर्करोगाशी लढण्यासाठी आम्हाला एकता आणि दृढनिश्चय आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की, यासारख्या नवकल्पना आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यात मदत करतील.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT