President Droupadi Murmu  Dainik Gomantak
देश

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी 'राफेल'मधून घेतली भरारी, पाकड्यांच्या दाव्याचीही पोलखोल; म्हणाल्या, 'हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव...' VIDEO

President Droupadi Murmu Rafale: आज अंबाला एअरबेसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमानातून यशस्वी उड्डाण केले, तेव्हा राफेल पायलट शिवांगी सिंह तिथे उपस्थित होत्या.

Manish Jadhav

President Droupadi Murmu Rafale: पाकिस्तानने केलेला आणखी एक खोटा दावा आज (29 ऑक्टोबर) पूर्णपणे उघड झाला. अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांनी भारताचे राफेल लढाऊ विमान पाडले असून एका भारतीय वैमानिकाला पकडले आहे. इतकेच नाही तर, सोशल मीडियावर अनेक बनावट पोस्टमध्ये ही वैमानिक विंग कमांडर शिवांगी सिंह असल्याचेही खोटे पसरवण्यात आले होते.

मात्र आज अंबाला एअरबेसवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमानातून यशस्वी उड्डाण केले, तेव्हा राफेल पायलट शिवांगी सिंह तिथे उपस्थित होत्या. या दृश्याने पाकिस्तानचे सारे खोटे दावे पूर्णपणे फेटाळले गेले. विंग कमांडर शिवांगी सिंह या भारतीय वायुसेनेच्या (Indian Air Force) पहिल्या महिला राफेल पायलट आहेत. उड्डाणापूर्वीच्या छायाचित्रांमध्ये राष्ट्रपती मुर्मू आणि विंग कमांडर शिवांगी सिंह दोघेही हसताना दिसल्या, ज्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या प्रचारावर पूर्णविराम लागला.

राष्ट्रपतींनी राफेलमधून घेतले उड्डाण

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाला एअरबेसवरुन राफेल (Rafel) लढाऊ विमानात उड्डाण केले. त्यांनी या अनुभवाला 'अविस्मरणीय' असे म्हटले. या उड्डाणासोबतच, राष्ट्रपती मुर्मू या 2 लढाऊ विमानांमधून उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती बनल्या. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये त्यांनी आसाममधील तेजपूर हवाई दल स्टेशनवरुन सुखोई-30 MKI लढाऊ विमानात उड्डाण केले होते. राफेलमधील हे उड्डाण सुमारे अर्धा तास चालले. विमानात सुमारे 200 किलोमीटर अंतर कापल्यानंतर ते परत अंबाला एअरबेसवर परतले. राफेल विमानाचे सारथ्य 17व्या स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन अमित गेहानी यांनी केले.

राफेल विमानाने सुमारे 15,000 फूट उंचीवर उड्डाण केले आणि या दरम्यान त्याची गती अंदाजे 700 किलोमीटर प्रति तास होती.

देशाच्या संरक्षण क्षमतेचा अभिमान

उड्डाणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी व्हिजिटर बुकमध्ये आपला अनुभव लिहिला. त्यांनी नमूद केले की, "अंबाला वायुसेना स्टेशनवर येऊन वायुसेनेच्या राफेल विमानात माझे पहिले उड्डाण घेऊन मला खूप आनंद झाला. राफेलमध्ये उड्डाण करणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे."

त्यांनी पुढे म्हटले, "या शक्तिशाली विमानात उड्डाण केल्याने माझ्या मनात देशाच्या संरक्षण क्षमतांबद्दल अभिमानाची एक नवीन भावना जागृत झाली आहे." या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी भारतीय वायुसेना आणि अंबाला वायुसेना स्टेशनच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT