Prashant Kishor
Prashant Kishor Dainik Gomantak
देश

प्रशांत किशोर लवकरच धरणार काँग्रेसचा हात?

दैनिक गोमन्तक

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि गांधी कुटुंबीयांमध्ये गेल्या काही दिवसांत बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत काँग्रेससमोर प्लॅन सादर केला होता. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही याबाबत एक समिती स्थापन केली होती, या समितीनेही आपला अहवालही सादर केला आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत कॉंग्रेसमध्ये एकमत नसल्याचे वृत्त आहे. त्यांना निवडणूक रणनीतीकार म्हणून वेगळी भूमिका देण्याच्या बाजूने काही नेते आहेत. प्रशांत किशोर यांना काँग्रेसचा पदाधिकारी बनवण्यास काही ज्येष्ठ नेते अनुकूल नाहीत. प्रशांत किशोर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सल्लागारपदी नियुक्ती करुन त्यांनी रणनीतीकाराची भूमिका कायम ठेवावी, असे बंडखोर नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी काही नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्याच्या बाजूने आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची भूमिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठरली जाईल. मात्र, यामध्येही एक अट आहे. प्रशांती किशोर यांच्या भूमिकेबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने म्हटले आहे की, 'प्रशांती किशोर यांनी इतर राजकीय पक्षांपासून दूर राहावे आणि पूर्णपणे काँग्रेससाठी काम करावे.'

याशिवाय, प्रशांत किशोर आणि त्यांच्या IPAC यांनी यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस, जगम मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील YSR काँग्रेससोबत विधानसभा निवडणुकीत काम केले आहे. मात्र प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास त्यांना हे सर्व थांबवावे लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रशांत किशोर यांच्या विरोधात पक्षाच्या काही नेत्यांचा हा सर्वात मोठा आक्षेप मानला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT