Prashant Pishor Dainik Gomantak
देश

Bihar Assembly Election: प्रशांत किशोर निवडणूक लढणार नाहीत, पक्षसंघटनात्मक कामासाठी निर्णय घेतल्याचा दावा

Bihar Assembly Election 2025: रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे बुधवारी जाहीर केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पाटणा: रणनीतीकार आणि जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे बुधवारी जाहीर केले. पक्षाच्या हिताचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

‘‘पक्षाने असा निर्णय घेतला आहे की, मी विधानसभा निवडणूक लढवायची नाही. त्यामुळेच पक्षाने राघोपूर येथून तेजस्वी यांच्या विरोधात दुसरा उमेदवार दिला आहे. पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मी जर निवडणुकीच्या रिंगणात उतरलो तर पक्ष कार्यापासून माझे लक्ष विचलित होऊ शकते,’’ असे किशोर यांनी सांगितले.

बिहार निवडणुकीत जन सुराज्य पक्षाचे १५० पेक्षा कमी उमेदवार निवडून आले तरच तो पक्षाचा पराभव झाला असे म्हणता येईल, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे. जनसुराज्य पक्षाला जर बिहारमध्ये जर सत्ता मिळाली तर संपूर्ण देशामध्ये त्याचा परिणाम होणार असून देशाच्या राजकारणाची दिशा बदलेले,’’ असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

‘‘आमच्या पक्षाला एक तर १०पेक्षा कमी जागा मिळतील किंवा १५० पेक्षा अधिक जागा मिळतील त्याच्या मध्ये कोणतीही संख्या असण्याची शक्यता नाही,’’ असा दावा किशोर यांनी केला. बिहारमध्ये त्रिशंकू स्थिती असणार नाही, असेही ते म्हणाले.

बिहारमधील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार पुन्हा सत्तेत येणे जवळपास अवघड आहे. यंदाच्या निवडणुकीत तर भाजपला उमेदवार निश्‍चित करणे अवघड ठरत आहे, तर नितीश यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे भवितव्यही अंधारात आहे, असा दावा किशोर यांनी केला.

किशोर म्हणाले, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. संयुक्त जनता दलाची (जेडीयूची) स्थिती अत्यंत कमजोर. एनडीएमध्ये गोंधळाचे वातावरण; भाजप आणि जेडीयूमध्ये अजूनही जागावाटपाबाबत स्पष्टता नाही इंडिया आघाडीतही वाद.

जनसुराज पक्ष सत्तेत आल्यास १०० भ्रष्ट नेते व अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांनी गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती एका महिन्याच्या आत जप्त करणार मला मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा नाही; पण बिहारमधील ६० टक्के नागरिकांना बदल हवा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटविश्वात खळबळ! पाकिस्तानच्या स्टार खेळाडूला अटक, फार्म हाऊसमध्ये मोलकरणीवर केला अत्याचार

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

SCROLL FOR NEXT