Prashant Kishor
Prashant Kishor  Dainik Gomantak
देश

प्रशांत किशोर देणार का काँग्रेसला नवसंजीवनी?

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवामुळे काँग्रेस हतबल झाले आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा फॉर्म्युला दिला आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Prashant Kishor to guide congress in coming elections)

काँग्रेसचे (Congress) गमावलेले स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी एक रोडमॅप तयार केला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी प्रेझेंटेशनही दिले आहे. 10 जनपथ येथे शनिवारी राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल, अंबिका सोनी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या घरी प्रशांत किशोर यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी कृती आराखडा सादर केला.

किशोर यांनी काँग्रेसला मीडिया रणनीती बदला, संघटना मजबूत करा आणि भाजपशी (BJP) थेट स्पर्धा असलेल्या राज्यांकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे.

370 जागांवर लक्ष केंद्रित करा
प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार देशातील सर्व 543 लोकसभेच्या जागा लढविण्याऐवजी काँग्रेसला निवडक जागांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. विशेषत: काँग्रेसने ज्या जागांवर आपली स्थिती आधीच मजबूत आहे अशाच जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करावी. किशोर यांच्या दृष्टीने लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 365 ते 370 जागांची निवड करून उमेदवार उभे करावेत, अशी स्थिती पक्षासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय उर्वरित जागांवर काँग्रेसने मित्रपक्षांसाठी 173 ते 180 जागा सोडाव्यात. किशोर यांनी काँग्रेससाठी त्या जागा निवडल्या आहेत, जिथे भाजप किंवा एनडीएच्या इतर मित्रपक्षांशी पक्षाची थेट लढत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT