Prashant Kishor and Sonia Gandhi Dainik Gomantak
देश

प्रशांत किशोर आणि सोनिया गांधींची दिल्लीत भेट

दैनिक गोमन्तक

आत्तापर्यंत अनेक राजकीय पक्षांच्या धोरणात्मक सल्लागाराची भूमिका बजावलेले प्रशांत किशोर आगामी काळात कॉंग्रेसची रणनीती आखण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत आज 10 जनपथ येथे झालेल्या भेटीतून हे संकेत मिळाले आहेत. (Prashant Kishor meets Congress President Sonia Gandhi in Delhi)

काही वेळापूर्वी प्रशांत किशोर सोनियायांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते येथे आधीच हजर आहेत. अशा परिस्थितीत किशोर बैठकीनंतर काही मोठी घोषणा करणार असल्याचे मानले जात आहे.

या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, एके अँटनी, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, मुकुल वासनिक, दिग्विजय सिंग आणि अजय माकन यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून गुजरात निवडणुकीत काँग्रेस प्रशांत किशोर यांना मोठी जबाबदारी देऊ शकते, अशी चर्चा आहे.

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची टीम गुजरातमध्येही सर्वेक्षण करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. या बैठकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही भेट घेतली आहे. पंजाब निवडणुकीपूर्वीही प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचीही चर्चा होती. मात्र, किशोर आणि काँग्रेसमधील बोलणी निष्फळ ठरली.

विशेष म्हणजे या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) सत्ता वाचवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल. अशा स्थितीत सोनिया आणि राहुल गांधी या दोन्ही राज्यात पक्षाची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT