तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानची (Afghanistan) सत्ता बळकावल्यानंतर भारताच्या सीमेपलीकडे (Indian Border) सुद्धा दहशतवाद्यांच्या हालचाली (Terrorist Attack) वाढल्या आहेत. गुप्तचर संस्था याकडे एक मोठा धोका म्हणून पाहत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळाल्यानंतर देशाच्या गुप्तचर संस्थांनी जम्मू -काश्मीरमधील (Jammu-Kashmir) दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी केला आहे.(Possibility of major attack in Jammu and Kashmir security agencies on alert)
एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार , ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात कंधारमध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे नेते आणि तालिबान नेते यांच्यात एक बैठक झाली होती . या बैठकीची माहिती मिळाल्यानंतर सर्व गुप्तचर यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबान नेत्यांचा एक गट या बैठकीत सहभागी झाला होता. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेने भारतावर हल्ले करण्यासाठी तालिबानचा समर्थन मागितले आहे .
श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्याची शक्यता -
पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही बैठकीत चर्चा झाल्याचे समजत आहे. अधिकारी म्हणाले- आम्ही गुप्तचर संस्थांना सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी पाकिस्तानातून दोन दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत आम्हाला गुप्तचर माहिती मिळाली असून हे दहशतवादी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. सर्व संबंधित यंत्रणांना आपापसात माहिती शेअर करत राहण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या, सर्व राज्ये आणि केंद्राच्या दहशतवादविरोधी युनिट्सला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
अफगाणिस्तान बनला हॉटस्पॉट -
5 ऑगस्ट रोजी तालिबानी दहशतवादी काबूलमध्ये घुसले, ज्यामुळे नागरी सरकार पाडले गेले. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाण लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काबुल विमानतळावर हजारो अफगाण नागरिक देश सोडून जाण्यासाठी जमले आहेत. हजारो लोक सीमा ओलांडून शेजारच्या देशांमध्ये गेले. दरम्यान, गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर हजारोंच्या गर्दीत आत्मघातकी बॉम्बस्फोटा झाले आहेत . या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 13 अमेरिकन सैनिक आणि किमान 169 अफगाण नागरिक मारले गेले आहेत.
भारत हाय अलर्टवर-
काबुल विमानतळाबाहेर झालेल्या साखळी स्फोटापूर्वी अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह सर्व देशांनी अशा मोठ्या हल्ल्याचा अलर्ट जारी केला होता. अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.हे लक्षात घेण्यासारखे आहे की काबूल विमानतळाबाहेर सुरक्षेची जबाबदारी तालिबानवर होती. तालिबानी लढाऊही ठिकठिकाणी तैनात होते. असे असूनही, दहशतवादी हल्ला थांबवता आला नाही आणि मोठ्या संख्येने निष्पाप लोक मारले गेले. यामुळेच आता हल्ल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर भारतीय एजन्सींसुद्धा अलर्ट वर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.