तालिबानी नेत्यांसोबत बैठक घेत जैशचे दहशतवादी भारताविरुध्द रचतायत षडयंत्र?

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू -काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी हल्ल्याबाबत चेतावणी जारी केली आहे.
 Taliban
Taliban Dainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानामध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) राजवट पुन्हा एकदा आल्यामुळे अनेक दहशतवादी संघटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. काबूल विमानतळावरील (Kabul Airport) दहशतवादी हल्ल्यानंतर प्रादेशिक सुरक्षेसाठी धोका लक्षणीय वाढला आहे. दरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू -काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी हल्ल्याबाबत चेतावणी जारी केली आहे. सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या उपस्थिती संबंधी माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही माहिती स्थानिक गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांसोबत शेअर करण्यात आली आहे. जेणेकरुन कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यास तयार असेल.

 Taliban
मसूद अझहरने घेतली तालिबान्यांची भेट; काश्मीरप्रश्नी मदतीची केली याचना

त्यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात कंधारमध्ये तालिबान नेत्यांशी भेटल्याची माहिती मिळाल्यापासून गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. या बैठकीत तालिबान्यांचा एक गट होता, जिथे जैशच्या दहशतवाद्यांनी 'भारताबद्दलच्या' त्यांच्या दुष्ट हेतूंसाठी समर्थन मागितले होते. सूत्रांच्या हवाल्याने, पाकिस्तानमधील राजकीय परिस्थितीवरही बैठकीत चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

सर्व संबंधित एजन्सी हाय अलर्टवर

“आम्ही गुप्तचर यंत्रणांना सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 24 ऑगस्ट रोजी आम्हाला दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालीशी संबंधित माहिती मिळाली, जी श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करण्याची योजना आखत होते. सर्व संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे. यासोबतच सर्व राज्यांना सुरक्षा अभ्यास आयोजित करण्यास आणि भारतातील दहशतवादविरोधी युनिट्सला (Anti-Terror Unites in India) हाय अलर्टवर ठेवण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये प्रवेश केला आणि त्यावर कब्जा केला. ज्यामुळे लोकांनी निवडलेले सरकार पडले.

 Taliban
UNHCR: अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडली तर, 5 लाख लोक देश सोडू शकतात?

काबूल विमानतळावर रिकामे करण्याचे काम सुरु

यानंतर, जगभरातील देशांनी आपल्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना खराब सुरक्षा परिस्थितीमुळे येथून बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही देशांनी अफगाण नागरिकांना देखील बाहेर काढले जे युद्धाच्या वेळी त्यांच्या सैन्यांना मदत करत होते. याशिवाय, हजारो अफगाण लोकही विमानतळावर पोहोचले, जे तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये राहण्यास तयार नाहीत. गुरुवारी काबूल विमानतळावर आत्मघातकी हल्ला झाला आणि बंदुकधारी लोकांनी सामान्य नागरिकांचा बळी घेतला. यामुळे 13 अमेरिकन सैनिक आणि किमान 169 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला. इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP) ने त्याच दिवशी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com