Jammu kashmir ANI
देश

Kashmir Killings: दहशतवाद्यांनी उपनिरीक्षकाची घरात घुसून केली हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक हत्या केली आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आणखी एक हत्या केली आहे. यावेळी पुलवामामध्ये एका उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी घरात घुसून हे हत्याकांड घडवून आणले. उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, जे घरात उपस्थित होते. (Kashmir Killings)

घरातून त्याचं अपहरण करून जवळच्या शेतात नेऊन गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. दोन ते तीन दहशतवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणले. मिळालेल्या माहितीनुसार, सब इन्स्पेक्टर फारुख अहमद मीर आयआरपीच्या 23 व्या बटालियनचे होते आणि सध्या ते सीटीसी लेठीपोरा येथे तैनात होते.

टार्गेट किलिंगची चिंता वाढली

या घटनेमागे कोणती संघटना आहे, हे सध्यातरी कळू शकलेले नाही. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यामुळे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची चिंता वाढली आहे. कारण गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे अनेक नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया काही दिवस थांबली होती, मात्र आता एका उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर पोलिस आणि लष्करासमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

SCROLL FOR NEXT