Israeli Embassy Dainik Gomantak
देश

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल

Delhi Police: अग्निशमन दलाला 5.45 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Manish Jadhav

Israeli Embassy: इस्रायल-हमास युद्धाचा आज 81 वा दिवस आहे. जगभरातील अनेक देश आणि नेते इस्रायलवर युद्धबंदीसाठी दबाव आणत आहेत, मात्र इस्रायल गाझा पट्टीवर दिवसेंदिवस हल्ले वाढवत आहे. यातच राजधानी दिल्लीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक फोन आला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने स्फोट झाल्याविषयी सांगितले होते. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सर्च ऑपरेशन सुरु केले. विशेष सेलची टीमही घटनास्थळी पाठवण्यात येत आहे.

अजून सुगावा लागला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला 5.45 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोटासारख्या घटनेची घटनास्थळी पुष्टी झालेली नाही आणि स्फोटाचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आहे. पोलीस या संपूर्ण परिसराची चौकशी करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या घटनास्थळी हजर आहेत.

लोकांनी मोठा आवाज ऐकला

दिल्ली अग्निशमन सेवा संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, दिल्ली अग्निशमन सेवेला आज संध्याकाळी चाणक्यपुरी भागातील इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाल्याचा कॉल आला होता. घटनास्थळी अद्याप काहीही आढळून आलेले नाही. मात्र, समोर काश्मीर भवनही आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, लोकांनी मोठा आवाज ऐकल्याचे सांगितले. हा आवाज कशाचा होता हे तपासानंतरच कळेल. घटनास्थळाची चौकशी सुरु आहे.

यापूर्वीही स्फोट झाला आहे

याआधीही दिल्लीतील इस्रायली दूतावासाला लक्ष्य करण्यात आले आहे. 29 जानेवारी 2021 रोजी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर IED स्फोट झाला होता. पोलिसांना घटनास्थळावरून काही बॉल बेअरिंग्सही सापडले ज्याचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी केला जात होता. यानंतरही इस्रायली दूतावासाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT