Police arrested the ransom seekers pretending to be ED officers Dainik Gomantak
देश

ED चा बनावट आधिकारी बनून खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी सापळा लावून अटक

ईडी कार्यालयातूनच मेल किंवा कॉल येत असल्याचे वाटावे यासासाठी कॉल करणारे स्पूफिंगद्वारे मेल पाठवायचे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे (Delhi Police) शाखेने ईडीच्या चार बनावट अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे लोक प्रवर्तन संचलनालयाचे अधिकारी असल्याचे सांगून दादागीरी करत होते. त्यांच्याविरुद्ध एका व्यक्तीने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. चारही आरोपी दिल्लीचे रहिवासी आहेत. या लोकांना संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. या टोळीचा मास्टरमाईंड डॉ.संतोष रॉय हा बनारसच्या एका मोठ्या नेत्याचा भाऊ आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर फसवणुकीचे 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी बनून काही लोक खंडणी मागत असल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. सीमाशुल्क मंजुरीचे काम करणारा मौजपूर येथील रहिवासी मोहम्मद रफिकला काहीलोकांनी ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत 50 लाख रुपयांची खंडणी मागीतली. ईडी कार्यालयातूनच त्यांना मेल किंवा कॉल येत असल्याचे वाटावे यासासाठी कॉल करणारे स्पूफिंगद्वारे मेल पाठवायचे.

रफीक यांनी याबाबत ईडीकडे तक्रार केली. गुन्हे शाखेने या बद्दल गुन्हा नोंदवत तपास केला असता, तेव्हा मोहम्मद रफिकला फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की त्याने वकिलाला भेटावे आणि पैसे भरण्यासाठी डील करावा. मोहम्मद रफिक त्या वकिलाला भेटले आणि करार निश्चित झाला. करारानुसार पहिला हप्ता म्हणून 22 लाख रुपये सुद्धा दिले जाणार होते.

26 ऑगस्ट रोजी आरोपींनी पैसे देण्यासाठी मोहम्मद रफिकला संसद मार्ग पोलीस ठाण्यासमोर बोलावले. गुन्हे शाखेचे निरीक्षक विवेकानंद झा आणि उपनिरीक्षक संजय गुप्ता यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी संतोष रॉय आणि भूपेंद्रला अटक केली. विशेष म्हणजे संतोषने 1997 मध्ये एमबीबीएस केले आणि काही काळ एम्समध्येही काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT