Munawwar Rana Dainik Gomantak
देश

मुनव्वर राणांचे मतदार यादीतून नाव झाले गायब; 'जेव्हा सरकारच संधी देत नाही तेव्हा...

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चौथ्या टप्प्यातील निवडणुका सुरु असून मतदार यादीतून नावे गायब झाल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चौथ्या टप्प्यातील निवडणुका सुरु असून मतदार यादीतून नावे गायब झाल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यातच लखनऊमधील प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचेही नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. नाव न सांगता नाराजी व्यक्त करत मुनव्वर राणा (Munawwar Rana) म्हणाले, 'जेव्हा सरकारच मतदानाची संधी देत ​नाही, तर मग दु:ख काय...' (Poet Munavvar Ranas Name Has Disappeared From The Voter list During The Uttar Pradesh Elections)

माध्यमाशी बोलताना राणा म्हणाले की, "माझ्या नशीबातच मतदान करणे नाही. मी राहतो त्या ठिकाणी लागूनच एक मतदान केंद्र आहे, माझ्या शेजारी असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणं मला सोपं होतं, परंतु जेव्हा काल मी इथल्या मतदान केंद्रावरील ऑफिसरकडून स्लिप मागितली तेव्हा त्या मतदार यादीत माझे नावचं नव्हते. फक्त माझ्या पत्नीचे मत आहे, तिला स्लिप मिळाली.

राणा पुढे म्हणाले, ''मागील वेळी माझे मत होते, तेव्हा माझे नाव मतदार यादीतून जाणिवपूर्वक वगळण्यात आले. मात्र माझे नाव न आल्याने असा अंदाज लावता येईल की, हे सुशासन नाही. गहाळ कारभारामुळे हा धक्कादायक प्रकार घडला.''

तसेच, निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा म्हणाले, 'ज्या मुद्द्यांवर निवडणुका व्हायला हव्या होत्या, त्या मुद्यांवर निवडणुका होत नाहीत. विशेषत: भाजप (Bjp) त्या मुद्द्यांवर लढत नाही ज्यावर त्यांना उत्तर द्यावे लागते. ज्या मुद्द्यांवर ते उत्तरे शोधत आहेत, त्या मुद्द्यांवर लढून भाजप निवडणूक लढवत आहे.''

तसेच राणा पुढे म्हणाले, ''धर्माच्या नावावर लढा... भाजप निवडणूक लढवत नाही तर गुंडगिरी करत आहे. गेल्या 70 वर्षात पक्षीय आधारावर निवडणुका झाल्या नाहीत, पूर्वीच्या निवडणुका मुद्यांवर आधारावर होत होत्या, परंतु आता निवडणुका पक्षीय आधारावर घेतल्या जातात. आपण कोणत्या पक्षाला मतदान करावे, असे लोकांना वाटते.''

मतदान करता न आल्याच्या प्रश्नावर कवी मुनव्वर राणा म्हणाले, 'मला काहीच दु:ख नाही, जेव्हा सरकारच मतदानाची संधी देत नाही, तेव्हा दु:ख काय असेल.'

शिवाय, मुनव्वर राणा लखनऊमध्ये (Lucknow) राहतात. नुकतीच त्यांनी अशी अनेक धक्कादायक वक्तव्य केली होती, ज्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत होते. वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले मुनव्वर राणा यावेळी मतदान करु शकणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT