Modi-Putin: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना पुन्हा एकदा युक्रेनचे युद्ध चर्चा आणि मुत्सद्देगिरीने मिटवावे, असे सांगितले. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार, ऊर्जा, संरक्षण तसेच इतर क्षेत्रातील वाढत्या सहकार्यावर चर्चा केली.
फोनवरील संभाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना G-20 परिषदेसाठीचे त्यांचे प्राधान्यक्रम सांगितले. शांघाय कोऑपरेशन परिषदेचा अध्यक्ष या नात्याने रशियासोबत एकत्र काम करण्यासही भारत उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. तवांगमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीनंतर पुतिन आणि पीएम मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या शिखर परिषदेत पुतिन आणि पंतप्रधान मोदींची भेट होणार नाही
भारत-रशिया शिखर परिषद 2000 पासून दरवर्षी होत आहे. ज्यामध्ये दोन्ही देशांचे नेते भेटतात. पण, यावेळी पंतप्रधान मोदी व्लादिमीर पुतिन यांच्याशी वैयक्तिक भेट घेणार नाहीत. रशियाने युक्रेन युद्धात अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पीएम मोदींनी पुतीन यांना न भेटण्याचा निर्णय घेतला होता.
भारत-रशिया शिखर परिषद हे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. या मंचाच्या आतापर्यंत 21 बैठका झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCO बैठकीत भेटले. या वेळी सुमारे 50 मिनिटे चाललेल्या दोघांमधील संभाषणात मोदींनी पुतीन यांना हे युद्धाचे युग नाही, असे सांगत युक्रेन युद्ध संपवण्याची मागणी केली.
G20 मध्ये सहभागी होण्यासाठी येणार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. G20 च्या रशियन शेर्पा स्वेतलाना लुकाश यांनी ही माहिती दिली. रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने सातत्याने दोन्ही देशांमधील राजनैतिक संतुलन राखण्याचा आग्रह धरला आहे. चर्चेतून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी भारत करत आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.