PM Narendra Modi And Mark Rutte Dainik Gomantak
देश

युक्रेनच्या परिस्थितीवरती पीएम नरेंद्र मोदींची पीएम मार्क रूट यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांचे नेदरलँड्सचे समकक्ष मार्क रुटे यांच्याशी युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी त्यांचे नेदरलँड्सचे समकक्ष मार्क रुटे (Mark Rutte) यांच्याशी युक्रेन (Ukraine) आणि रशियादरम्यान (Russia) सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia-Ukraine War) उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा केली आहे. यादरम्यान त्यांनी युक्रेनमध्ये यामुळे उद्भवलेल्या मानवतावादी संकटाबाबतही आपल्या चिंता व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. (PM Narendra Modis discussion with PM Mark Root on situation in Ukraine)

पीएमओने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा केली आणि तेथे सुरू असलेल्या मानवतावादी परिस्थितीबद्दल त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेचे स्वागत केले आणि लवकरच यावरती तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली आहे.

पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी रूट यांना युद्धग्रस्त देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबविल्या जात असलेल्या मोहिमेच्या प्रगतीची माहिती दिली आहे. यासोबतच तेथील बाधितांना भारतातून औषधांसह आवश्यक मदत साहित्याचा पुरवठा करण्यात आल्याची देखील माहितीही त्यांनी दिली आहे.

यादरम्यान पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधान रूट यांच्यासोबत झालेल्या डिजिटल कॉन्फरन्सची आठवण करून दिली आणि रूटला भारत भेटीचे निमंत्रणही दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT