PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान मोदी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी साधणार संवाद

Russia-Ukraine War: 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन संवाद साधला होता.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी फोनवर बोलणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत युद्धग्रस्त देशातील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे तीव्र प्रयत्न करत असताना या संवादाला महत्त्व प्राप्त झाले. 26 फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरुन संवाद साधला होता. (PM Narendra Modi will hold talks with Ukrainian President Volodymyr Zelenskyy today)

मोदींनी युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान द्यावे असेही ते म्हणाले होते, झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचा पाठिंबा मागितला होता. मात्र, भारताने आतापर्यंत रशियाविरुद्धच्या ठरावांवरील सर्व मतदानापासून दूर राहिले.

"पंतप्रधान मोदी आज सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर बोलतील," असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. 3 मार्च रोजी, मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही संवाद साधला होता आणि युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किवमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशियाची मदत मागितली होती.

भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' (Operation Ganga) अंतर्गत, रोमानिया आणि हंगेरीसह शेजारील देशांद्वारे युक्रेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना देशातून बाहेर काढण्यात आले. केंद्राने चार मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांना पाठवण्यात आले आहेत.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटरवरती सांगितले: "आज, 7 उड्डाणे अंदाजे 1200 भारतीय नागरिकांना घरी आणणार आहेत."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT