PM Modi Roadshow Dainik Gomantak
देश

PM Modi Roadshow: पंतप्रधान मोदींचा सोमवारी दिल्लीत होणार ग्रॅन्ड 'रोड शो'

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयानंतर पक्षाची पहिलीच बैठक दिल्लीत होत आहे.

Pramod Yadav

भारतीय जनता पक्षाने (BJP) 16 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून पटेल चौक ते संसद मार्ग-जयसिंग रोड जंक्शन असा रोड शो आयोजित केला आहे. या रोड शोमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Road Show In Delhi) सहभागी होणार आहेत. रोड शोच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहतूकीत महत्वपूर्ण बदल केला असून, याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदींचा हा रोड शो जवळपास एक कि.मी एवढ्या अंतरात होणार आहे. यावेळी विविध राज्यातील कलाकार आपली कला सादर करतील. तसेच, पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयानंतर पक्षाची पहिलीच बैठक दिल्लीत होत आहे. दरम्यान, गुजरात निवडणुकीत देखील मोदींनी प्रचारादरम्यान, तब्बल 50 कि.मी.चा रोड शो केला होता.

दिल्लीतील बाबा खरक सिंग रोड, आऊटर सर्कल कॅनॉट प्लेस, पार्क स्ट्रीट/शंकर रोड, मिंटो रोड, मंदिर मार्ग, बाराखंबा रोड, पंचकुआन रोड, रायसीना रोड, टॉलस्टॉय रोड, जनपथ, फिरोजशाह रोड, रफी मार्ग, राणी झांसी रोड, डीबीजी रोड, चेम्सफोर्ड रोड, भाई वीर सिंग मार्ग, डीडीयू मार्ग, रणजित सिंग फ्लायओव्हर, तालकटोरा रोड आणि पंडित पंत मार्गावर या रोड शो दरम्यान प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. असे नियमावलीत सांगण्यात आले आहे.

रोड शो दरम्यान हे मार्ग राहणार बंद

वाहतूक नियमावलीनुसार अशोक रोड, संसद मार्ग, टॉलस्टॉय रोड, रफी मार्ग (रेल भवन ते संसद मार्ग), जंतर मंतर रोड, इम्तियाज खान मार्ग आणि बांगला साहिब लेन सोमवारी दुपारी 2.30 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत बंद राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोणीतरी गोव्यात येतो, स्पर्धा नियोजन करतो,त्याची संबंधित खात्यांना पुसटशीही कल्पना नसते हा 'चिंतेचा विषय'

पंढरपूरच्या ‘बाबा’चा बेळगावात 2 कोटींचा घपला; घरबसल्या अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली 8,000 महिलांना गंडवले

Ravi Naik: काँग्रेसने 'रवीं'ना खरेच न्याय दिला नाही?

Goa Live News: 48 पणजी स्मार्ट सिटी ईव्ही बस सेवा पुन्हा सुरू

Mormugao Municipality Action : मुरगावातील व्यापारी पालिकेच्या रडारवर! दुकान सील, आणखी काहीजणांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT