Prime Minister Narendra Modi dainikgomantak
देश

Ukraine Rescue Mission : पंतप्रधान 4 कॅबिनेट मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशात पाठवणार

Ukraine Rescue Mission : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी 4 कॅबिनेट मंत्री जाणार

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : रशियाने (Russia) देशावर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या संख्येने भारतीय, बहुतांश विद्यार्थी, युक्रेनमध्ये (Ukraine) अडकून पडले आहेत तर, भारताने त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली असून पंतप्रधान मोदी यांनी आज सोमवारी तातडीची उच्चस्तरिय बैठक बोलावली होती. त्याबैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी 4 कॅबिनेट मंत्री पाठवले जाणार आहेत. यात केंद्रीय मंत्री (Union ministers) हरदीप पुरी (Hardeep Puri), ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia), किरन रिजिजू (Kiren Rijiju) आणि व्हीके सिंह (V K Singh) युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांना या मोहिमेचे समन्वय साधण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भेट देणार आहेत. हे मंत्री भारताचे 'विशेष दूत' म्हणून तेथे जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. (PM Narendra Modi sends four Union Ministers to countries bordering Ukraine)

युक्रेनमधून (Ukraine) भारतीयांना (Indian's) बाहेर काढण्यासाठी सिंधिया रोमानिया (Romania) आणि मोल्दोव्हा येथून समन्वय साधतील, तर रिजिजू स्लोव्हाकियाला (Slovakia) जाणार आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरीला (Hungary) जाणार असून जनरल व्हीके सिंग पोलंडला (Poland) जाऊन भारतीयांना बाहेर काढण्याची व्यवस्था करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते. मोदींनी रविवारी युक्रेन संकटावर एका बैठकीचे आयोजन केले होते. भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि त्यांना युद्धग्रस्त देशातून बाहेर काढणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या बैठकीत युक्रेनच्या शेजारी देशांशी आणखी सहकार्य करण्यावर चर्चा झाली जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना युद्धग्रस्त देशातून बाहेर काढता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT