युक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक घेतली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) देखील या बैठकीचे भाग होते ज्यात उच्च सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. उत्तर प्रदेशातून परतल्यावर मोदींनी लगेचच बैठकीचे अध्यक्षपद भूषवले, आणि जिथे त्यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) भाजपच्या (BJP) प्रचाराचा भाग म्हणून रॅलींना संबोधित केले आहे. (PM Narendra Modi holds high level meeting on Ukraine crisis)

PM Narendra Modi
Russia-Ukraine Meeting: अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले...चर्चेची संधी गमावू शकत नाही'

रशियाने (Russia) देशावर केलेल्या हल्ल्यानंतर मोठ्या संख्येने भारतीय, बहुतांश विद्यार्थी, युक्रेनमध्ये (Ukraine) अडकून पडले आहेत तर, भारताने त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली असून शनिवारपासून 1100 हून अधिक लोकांना मायदेशात परत आणण्यात आले आहे.

मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे नेते वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी बोलने केले आहे तर, भारताने हे संकट दूर करण्यासाठी संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com