Deepfake Videos|PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

पंतप्रधान मोदींनाही Deepfake Videos ची चिंता, अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा

Deepfake Videos: अलीकडेच सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओचा मुद्दा गाजला होता. डीपफेक व्हिडिओ म्हणजे एका व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावणे. अनेक सेलिब्रिटींचे असे व्हिडिओ समोर आले आहेत.

Ashutosh Masgaunde

PM Narendra Modi has taken a strong stance on the misuse of artificial intelligence and the growing incidence of deepfake videos:

कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर आणि डीपफेक व्हिडिओंच्या वाढत्या घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. शुक्रवारी एका भाषणात त्यांनी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली.

शुक्रवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात झालेल्या दिवाळी मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला. प्रसारमाध्यमांनी लोकांना या संकटाची जाणीव करून द्यावी, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी डीपफेक व्हिडिओंच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असेही सांगितले की, "मी स्वतःचा एक डीपफेक व्हिडिओ देखील पाहिला आहे. माझ्या काही चाहत्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये मी गरबा खेळताना दिसत आहे."

पंतप्रधान पुढे म्हणाले की, असे व्हिडिओ दाखवताना ते डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले गेले आहेत असे एआय कंपन्यांनी दाखवणे बंधनकारक असावे.

अलीकडेच सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओचा मुद्दा गाजला होता. डीपफेक व्हिडिओ म्हणजे एका व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावणे. अनेक सेलिब्रिटींचे असे व्हिडिओ समोर आले आहेत.

यामध्ये रश्मिका मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ प्रकाशझोतात आला, त्यानंतर कतरिना कैफ, काजोल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटींचे असेच व्हिडिओ समोर आले.

रश्मिका मंदान्ना हिच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

डीपफेक तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी छठ सणासंदर्भात महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या. छठ सणाला त्यांनी राष्ट्रीय सण म्हटले.

यासह त्यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, विकसित भारत हे केवळ शब्द नसून वास्तव आहे.

पीएम मोदी म्हणाले की, लोकल फॉर व्होकल मिशनला सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच भारताने कोविड-19 ला ज्या प्रकारे सामोरे जाण्यात यश मिळवले आहे, त्यावरून भारतीयांना आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, देश आता थांबणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT