पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातच्या (Gujarat) दौऱ्यावर असणार आहेत, त्यादरम्यान ते गुजरातला अनेक भेटवस्तू देणार आहेत. गुजरातमधील अंतराळ क्षेत्रातील खाजगीकरणाला प्रोत्साहन देत भारताच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींनी मजबूत पावले उचलली आहेत. अहमदाबाद येथील इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) मुख्यालयाचे उद्घाटन करण्यासोबतच ते नवसारी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे देखील उद्घाटनही यावेळी करणार आहेत. (PM Narendra Modi Gujarat tour will inaugurate several projects including IN SPACE headquarters)
ट्विटरवरती माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात दौऱ्यावर असताना नवसारी आणि अहमदाबादमधील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याचे सांगितले गेले आहे. यादरम्यान ते गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात गौरव अभियानात देखील सहभागी होतील. ज्यामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते नवसारीतील एएम नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स, निराली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खरेल एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करतील. पीएम मोदी म्हणतात की, नवसारीच्या सर्व प्रकल्पांमुळे दक्षिण गुजरातच्या लोकांना अनेक फायदे मिळून जातील.
यानंतर पीएम मोदी बोपल, अहमदाबाद येथील इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) मुख्यालयाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील. भारताच्या अंतराळ क्षेत्रात परिवर्तन घडवण्यात इंडियन नॅशनल सेंटर फॉर स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन (IN-SPACE) महत्त्वाची भूमिका बजावेल, असं ही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.