PM Modi Dainik Gomantak
देश

Vande Bharat Train New Route: आता 'या' नव्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू; PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा व्हिडिओ

पीएम मोदींनी आज राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे.

Puja Bonkile

PM Narendra Modi flags off Ajmer Delhi Cantt Vande Bharat: पीएम मोदींनी आज राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे.

  • OHE वर धावणारी सेमी हाय स्पीड ट्रेन

पीएम मोदींनी आज  राजस्थानमधील (Rajasthan) पहिल्या वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान चालवली जाणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा एक तास कमी लागणार आहे.

ही ट्रेन जगातील सर्वात उंच OHE वर धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन असेल, ही त्याची खासियत असेल. सामान्य OHE पेक्षा जास्त वेगाने धावणारी ही पहिली वंदे भारत ट्रेन असेल.

  • अजमेरला 5 तास 15 मिनिटांत पोहोचणार

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी वंदे भारत ट्रेन जयपूर ते दिल्ली कॅन्टपर्यंत धावणार आहे. दुसऱ्या दिवसापासून अजमेर ते दिल्ली कॅन्ट दरम्यान ट्रेन सामान्यपणे धावेल.

ही ट्रेन दिल्ली (Delhi) ते अजमेर हा प्रवास 5 तास 15 मिनिटांत पूर्ण करेल. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनने पुष्कर, अजमेर शरीफ दर्ग्यासाठी प्रवास करता येणार आहे.

  • ट्रेनचा सरासरी वेग 72.74 किमी प्रतितास

या ट्रेनचा सरासरी वेग 72.74 किमी प्रतितास आहे. प्रति तास असेल. अजमेर आणि दिल्ली दरम्यान ट्रेनचे तीन थांबे जयपूर, अलवर आणि गुडगाव असतील.

अजमेरहून सकाळी 6.20 वाजता सुरु होणारी ही ट्रेन जयपूरला सकाळी 7.55 वाजता पोहोचेल. येथून सकाळी 8 वाजता सुटेल आणि 9.40 वाजता अलवरला पोहोचेल आणि नंतर 11.21 वाजता गुडगावला पोहोचेल. यानंतर ही ट्रेन सकाळी 11.35 वाजता दिल्ली कॅन्टला पोहोचेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT