PM Teleprompter Went Off Dainik Gomantak
देश

PM मोदींच्या चालू कार्यक्रमात टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड अन्...

कोरोना संकटच्या काळात जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला होता.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या दावोस अजेंडा बैठकीला उपस्थीती लावली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाची क्लिप शेअर करत काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला. यासोबतच काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोना संकटच्या काळात जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला होता. यावेळी अचानक नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. यावरून काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. टेलिप्रॉम्प्टर (Teleprompter) थांबल्यामुळे पंतप्रधान पुढे बोलले नाहीत, असा आरोप केला जात आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, 'टेलिप्रॉम्पटर सुद्धा इतके खोटे सहन करू शकत नाही.' दुसरीकडे, काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 'हमे तो टेलिप्रॉम्पटरने लूटा, अपनो में कहा दम था', असे म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपा नेत्यांकडूनही काँग्रेसवर पलटवार करण्यात आला आहे. दिल्ली भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी म्हटले आहे की, जागतिक आर्थिक परिषदेकडून तांत्रिक त्रुटी झाली होती, त्यामुळे पंतप्रधानांनी भाषण थांबवले. दरम्यान, असे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की टेलिप्रॉम्प्टरमध्ये दोष आलेला नाही, तर व्यवस्थापकीय टीमने पंतप्रधानांना थांबण्यास सांगितले होते आणि प्रत्येकजण त्यांचा आवाज ऐकत आहे की नाही हे विचारले जात होते.

जागतिक आर्थिक परिषदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशात झालेले 10 मोठे बदल सांगितले आणि आता कठीण काळ संपल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे, असे सांगत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT