PM Modi  Dainik Gomantak
देश

Rojgar Mela: पंतप्रधान मोदी देणार देशातील तरुणांना रोजगाराची भेट, 10 लाख रोजगार देण्याचे लक्ष्य

PM Modi Latest News: पंतप्रधान मोदी आज 'रोजगार मेळा' मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणजेच आज 10 लाख जवानांसाठी भरती मोहिमेला सुरुवात करणार आहेत. या मोहिमेला ‘रोजगार मेळा’ (Rojgar Mela) असे नाव देण्यात आले आहे. यादरम्यान पंतप्रधान 75,000 नवनियुक्त तरुणांना नियुक्तीपत्रे प्रदान करतील. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) गुरुवार 22 ऑक्टोबर 2022 रोजी एका निवेदनात ही माहिती दिली. त्यानुसार पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधितही करणार आहे.

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल, असे पीएमओने म्हटले आहे. या वर्षी जूनमध्ये पंतप्रधानांनी सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांना मिशन मोडद्वारे 10 लाख पदांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले.

  • रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोड

पीएमओने सांगितले की, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार सर्व मंत्रालये आणि विभाग मंजूर पदांवरील विद्यमान रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहेत. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त केले जातील. नव्याने भरती झालेले कर्मचारी विविध स्तरावर सरकारमध्ये रुजू होतील. 

  • या पदांवरील नियुक्त्या होत आहेत

पीएमओने सांगितले की ज्या पदांसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस यासह इतरांचा समावेश आहे. पीएमओने म्हटले आहे की या नियुक्त्या मंत्रालये आणि विभाग स्वतःहून किंवा मिशन मोडमध्ये नियुक्त करणार्‍या एजन्सीद्वारे करत आहेत. या एजन्सींमध्ये संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि रेल्वे भरती मंडळाचा समावेश आहे. पीएमओने सांगितले की, जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT