PM Modi to launch PM Vishwakarma Yojana Dainik Gomantak
देश

वाढदिवसाच्या मुहूर्तावर पीएम मोदी सुरू करणार PM Vishwakarma Yojana, जाणून घ्या वैशिष्ट्ये

PM Modi: या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि पीएम विश्वकर्मा योजना ओळखपत्र दिले जाईल. त्यानंतर साहित्यासाठी लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

Ashutosh Masgaunde

PM Modi to launch PM Vishwakarma Yojana, Know Features, Objectives, Beneficiaries and Benefits:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी देशातील कामगारांना मोठी भेट देणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी कामगारांसाठी विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत.

केंद्र सरकारने 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. अर्थसंकल्पात सरकारने 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांसाठी यासाठी 13,000 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट हे गुरू-शिष्य परंपरेला बळकट करणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे, ही एक वंश-आधारित परंपरा आहे जिथे कारागीर आणि शिल्पकार हाताने बनवलेली तंत्रे आणि साधने वापरून त्यांच्या पारंपारिक कौशल्यांला चालना देतात.

या योजनेचा उद्देश कारागीर आणि शिल्पकार यांच्या पारंपारिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे हा आहे.

याव्यतिरिक्त, ही योजना या कुशल कारागिरांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांची आणि सेवांची क्षमता आणि पुरवठा दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न करते.

विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा कुंभार, लोहार, चांभार, पारंपारिक खेळणी बनवणारे, सोनार, सुतार, गवंडी, बोटवाले, न्हावी, धोबी, शिंपी, शिल्पकार आणि दगडी कोरीव काम करणाऱ्यांना लाभ मिळेल.

असा मिळवा विश्वकर्मा योजनेचा लाभ

पीएम किसान योजनेप्रमाणेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी नोंदणी आणि नंतर पडताळणी करावी लागेल. यानंतर, या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि पीएम विश्वकर्मा योजना ओळखपत्र दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेतून हे फायदे मिळणार

  • प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत नोंदणी आणि ओळखपत्र मिळाल्यानंतर, कामाच्या साहित्यासाठी लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 15,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. जेणेकरून ते त्यांचे काम सुरू करण्यासाठी साहित्य विकत घेऊ शकतील.

  • यासोबतच लाभार्थी कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत त्यांना प्रतिदिन ५०० रुपये मानधन दिले जाईल.

  • कौशल्य प्रशिक्षणानंतर कामगार कोणत्याही हमीशिवाय एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे घेऊ शकतात.

  • कौशल्य प्रशिक्षणानंतर कामगारांना सरकारकडून प्रगत कौशल्य प्रशिक्षणाची संधीही उपलब्ध करून दिली जाईल.

  • या योजनेच्या लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी प्रशिक्षित कामगारांना प्रोत्साहनपर रक्कमही मिळणार आहे.

  • या योजनेचे लाभार्थी असलेल्या कामगारांना केंद्र सरकारकडून ब्रँडिंग आणि एंडोर्समेंटसाठी एक व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Suicide Attack In Pakistan: पाकिस्तानी सैन्याच्या चेकपोस्टला पुन्हा बनवले निशाणा! आत्मघाती हल्ल्यात 20 सैनिक मारल्याचा दावा, धडकी भरणारा VIDEO व्हायरल

IND vs AUS Live Streaming: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहता येणार? काय आहे सामन्याची वेळ? जाणून घ्या सर्व

SCROLL FOR NEXT