Akbaruddin Owaisi Criticized PM Modi Dainik Gomantak
देश

Lok Sabha Election 2024: 'हा देश आमचा होता आणि आमचाच राहणार', PM मोदींच्या वक्तव्यावर अकबरुद्दीन ओवेसींचा पलटवार

Manish Jadhav

Akbaruddin Owaisi Criticized PM Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे, भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधक जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच, रविवारी राजस्थानमधील बांसवाडा येथे पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणावरुन राजकीय वादंग सुरुच आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास देशाची संपत्ती घुसखोरांमध्ये वाटून देईल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वादंग सुरु झाला. आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यांवरुन सडकून टीका केली. ओवेसी म्हणाले की, 'हा देश आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहणार आहे.'

दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी बड्या भाजप नेत्यांच्या परिवाराविषयी सांगितले. ओवेसी म्हणाले की, ''वाजपेयी आणि त्यांचे बंधू-भगिनींची संख्या 7 आहे. योगी आदित्यनाथ आणि त्यांची भावंडांची संख्या 7 आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि त्यांची भावंडंही 7 आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भावंडांची संख्या 6 आहे.''

आम्ही मुस्लिम घुसखोर नाही

अकबरुद्दीन ओवेसी यांनी जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले की, ''आम्ही मुस्लिम घुसखोर नाही. आम्हीच या देशाला सात आश्चर्यापैकी एक असणारा ताजमहाल दिला. आम्हीच या देशाला कुतुबमिनारची भव्यता प्रदान केली.'' ते पुढे म्हणाले की, ''आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. हा देश आमचा होता, आमचा आहे आणि सदैव आमचाच राहील. आम्हाला येथून कोणीही बाहेर काढू शकत नाही.''

ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींना हिटलर म्हटले

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला. ओवेसी म्हणाले की, ''नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत. भारतातील (India) एका एवढ्या मोठ्या समुदयाबद्दल अशाप्रकारे बोलणे त्यांना शोभत नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत.'' ते पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी मुस्लिमांवर जास्त मुले असल्याचा आरोप करतात, पण त्यांना किती भाऊ-बहिणी आहेत हे का सांगत नाहीत? त्यांचे भाषण ऐकून असे वाटले की, जणू हिटलर बोलत आहे, भारताचा पंतप्रधान नाही.''

ओवेसी पुढे म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलत असताना सांगितले होते की, आज भारतातील मुस्लिम 1930 च्या दशकातील जर्मनीतील ज्यूंसारखे स्वत:ला समजतात. हिटलरनेही ज्यूंना गॅस चेंबरमध्ये टाकण्यापूर्वी त्यांच्या विरोधात भाषणे द्यायला सुरुवात केली होती आणि आज नरेंद्र मोदीही त्याच पद्धतीने बोलत आहेत.'' आम्ही कोणाची संपत्ती हडपली हे पंतप्रधान मोदींनी सांगावे असा सवाल देखील यावेळी ओवेसी यांनी विचारला. ओवेसी शेवटी म्हणाले की, ''पंतप्रधान खोटं बोलत आहेत. पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणतात पण आम्ही त्यांना संसदेत अनेकदा विचारले की देशात किती घुसखोर आहेत ते सांगा. मात्र या प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत.''

राजस्थानमधील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले होते की, यापूर्वी सत्तेत असलेल्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये मालमत्ता वाटली जाईल, असे सांगितले होते. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात 'घुसखोर' शब्दाचा प्रयोग केला. काँग्रेस सत्तेत आल्यास माता-भगिनींचे मंगळसूत्रही राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस तुमची कमाई घुसखोरांमध्ये वाटून देईल, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT