Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
देश

PM मोदींनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी साधला संवाद; रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी...

Manish Jadhav

Prime Minister Narendra Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा पुतीन यांच्याशी बोलून त्यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

त्याचवेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, संघर्ष लवकर संपवण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा सतत पाठिंबा असल्याचे सांगितले. भारत त्याच्या लोककेंद्रित दृष्टिकोनानुसार मानवतावादी सहाय्य प्रदान करणे सुरु ठेवेल.

तत्पूर्वी, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदींनी रशियाच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या. दूरध्वनी संभाषणात, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसरीकडे, येत्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. "राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोललो आणि रशियन फेडरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले," असे मोदींनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. येत्या काही वर्षांत भारत-रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी काम करत असल्याचे मोदींनी म्हटले.

दरम्यान, रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा करताना, मोदींनी पुढे जाण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले. पुतिन यांनी नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला. पुतीन डिसेंबर 1999 पासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून नेतृत्व करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT