Jawaharlal Nehru Birth Annversary Dainik Gomantak
देश

Jawaharlal Nehru Birth Annversary: पंतप्रधान मोदींपासून सोनिया गांधींपर्यंत दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jawaharlal Nehru Birth Annversary News: आज पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात बालदिनही साजरा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 रोजी झाला. आज देशभरात माजी पंतप्रधान नेहरूंची 133 वी जयंती साजरी होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अनेक राजकिय नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ट्विट करत लिहिले, “आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेले योगदानही आम्हाला आठवते. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेले योगदानही आम्ही स्मरण करतो.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पंडित नेहरूंची आठवण काढली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे.

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील शांती वन स्मारकावर पंडित नेहरूंना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंडित नेहरूंचे जीवन आणि त्यांच्या कार्यकाळातील भारताचे प्रकल्प आणि उपलब्धी दर्शविणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ पोस्ट करताना त्यांचे स्मरण केले.

काँग्रेस अध्यक्षांनी ट्विटमध्ये लिहिले की, “आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू. 21व्या शतकातील भारताची कल्पना त्यांच्या अतुलनीय योगदानाशिवाय करता येत नाही. लोकशाहीचे चॅम्पियन, त्यांच्या पुरोगामी विचारांनी आव्हानांना न जुमानता भारताच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विकासाला चालना दिली. खऱ्या देशभक्ताला माझी विनम्र श्रद्धांजली.

  • बालदिन साजरा केला जात आहे

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुलांची खूप आवड होती. ते अनेकदा मुलांमध्ये जाऊन त्यांना सांभाळत असे. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत.  यामुळेच दरवर्षी माजी पंतप्रधानांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. यानिमित्त शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश भारताच्या भविष्यावर संस्कार आणि संस्कारांचे सिंचन करणे हा मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT