9 Years Of Modi Government: भारताचा शेजारी पण हेतू चुकीचा. मोठे बोलणे आणि आश्वासनांना केराची टोपली दाखवणे जणू त्या देशाच्या सवयीचा भाग. मैत्रीचा हात पुढे करुन विस्तारवादी धोरण जपायचे... खरंच, या देशाबद्दल काय बोलायचे.
त्याचा हेतू नेहमी दुसऱ्याची जमीन काबीज करण्याचा राहिला आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की, आम्ही कोणत्या देशाबद्दल बोलत आहोत. ज्या चीनवर भारताने प्रत्येक वेळी भरवसा ठेवला त्याच चीनने प्रत्येकवेळी घात केला.
दरम्यान, 2014 मध्ये देशात सत्तापरिवर्तन झाले. भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर आला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होताच मोदींनी परराष्ट्र धोरणाला प्राधान्यक्रम दिला.
परदेश दौरे करुन पंतप्रधानांनी मुत्सद्देगिरी प्रस्थापित केली. प्रत्येक देशाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
पंतप्रधान मोदींचा अचानक पाकिस्तान दौरा आणि शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आमंत्रण या गोष्टीचा पुरावा आहे की, भारताने पाकिस्तानशीही चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बदल्यात उरी आणि पुलवामा सारखे हल्ले भारताच्या पदरी पडले.
दुसरीकडे, भारताला चीनशीही चांगले संबंध अपेक्षित होते. परंतु बदल्यात गलवानचा हिंसाचार भारताच्या पदरी पडला.
2017 डोकलाम वाद: गलवान हिंसाचाराच्या आधी चीनने डोकलामवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. भारत-चीन आणि भूतान यांच्यातील वादग्रस्त जमिनीवर चीन (China) रस्ता बांधण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, भारताने त्याला कडाडून विरोध केला. आपले सामरिक हित लक्षात घेऊन भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले.
भारत-चीन सीमेवरील भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक होती. येथे लष्करापर्यंत रसद सहजासहजी पोहोचू शकत नव्हती. हिवाळ्याच्या हंगामात तर ते अशक्य होते. सियाचीन सीमेवर तापमान -40 अंशांपर्यंत खाली जाते.
मात्र, असे असतानाही भारताने (India) त्या भागात पायाभूत विकासास चालना देण्यास सुरुवात केली. त्यामुळे चीनला निश्चितच धक्का बसला. त्याचाही चीनने निषेध केला. पण केंद्रातील मोदी सरकार डगमगले नाही.
भारत आणि चीनमधील आयात-निर्यात संतुलन बिघडले होते. मात्र मोदी सरकारने चिनी आयातीवर शुल्क वाढवले आणि अनेक निर्बंधही लादले. इथे आपली डाळ शिजत नसल्याचे चीनला लवकरच समजले. आपल्या हिताला प्राधान्य देऊन, भारत सरकारने आपल्या देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले.
2019 मध्ये जेव्हा काश्मीरमध्ये पुलवामा हल्ला झाला तेव्हा सरकारने तात्काळ पाकिस्तानला दिलेला MFN दर्जा काढून घेतला. पाकिस्तान आणि चीन हे कट्टर मित्र आहेत. आर्थिक दबाव वाढवणे आणि पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या एकाकी पाडणे हा भारताचा उद्देश होता.
जेव्हा संपूर्ण जग चीनमधून उद्भवलेल्या कोरोना विषाणूशी झुंज देत होते, तेव्हा आपल्या देशातील लोकांची काळजी करण्याऐवजी चीन विस्तारवादी नीतीची अवलंब करत भारताचा भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता.
जून 2020 मध्ये, चीनी सैन्याने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली. मात्र, भारतीय जवानांच्या शौर्यामुळे चिनी सैन्यांना पळून जावे लागले. या घटनेत दोन्ही बाजूचे जवान शहीद झाले.
यानंतर भारताने सीमावर्ती भागांत मोठ्याप्रमाणात पायाभूत सुविधा विकसित करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर, लष्करी क्षमतेवर देखील मोदी सरकारने लक्ष दिले. राफेलसारखी लढाऊ विमाने भारतीय लष्करात सामील करण्यात आली.
अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी आपण चीनवर अवलंबून होतो. त्याला रोख लावणे अशक्य वाटत होते. मात्र 2020 पासून मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताचा पाया घातला. चीनच्या विरोधात एक सामाजिक विचार जन्माला आला. लोकांनी चिनी उत्पादने खरेदी करणे बंद केले. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत सरकारने व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरु केला. चीनसाठी हा मोठा धक्का होता. मोदी सरकारने हा कार्यक्रम चीन दावा करत असलेल्या भागांच्या विकासासाठी सुरु केला. चीन अरुणाचल प्रदेशला आपला भाग मानतो.
मोदी मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयात या कार्यक्रमासाठी 4800 कोटींची तरतूद करण्यात आली. याअंतर्गत भारत-चीन सीमेवर वसलेल्या गावांचा कायपालट करण्याचा ध्यास मोदी सरकारने घेतला, त्या गावांना व्हायब्रंट करण्यात येत आहे.
भारत हा क्वाड देशांचा सर्वात महत्त्वाचा सदस्य आहे. क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. चीन हा या चौघांचाही शत्रू आहे. या चौघांशीही चीनचे चांगले संबंध नाहीत. अशा स्थितीत या चार जणांचा गट चीनला नेहमीच त्रास देतो.
चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध अजूनही ताणलेले आहेत. तर जपानशी चीनचे जुने वैर आहे. दुसरीकडे, चीन भारताच्या बाततीत रोज नवनव्या कुरपती करत असतो. अशा परिस्थितीत चीनला घेरण्यासाठी क्वाड हे सर्वात मोठे शस्त्र आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.