PM Narendra Modi: 'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, भाजप 300 हून...'; गुवाहाटीत अमित शाहंनी भरला हुंकार!

Union Home Minister Amit Shah: एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, '2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.'
Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit ShahDainik Gomantak

Union Home Minister Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, '2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.'

यावेळी काँग्रेस सध्याच्या जागांपेक्षा कमी आकडा गाठेल, असा दावाही शाह यांनी सभेत केला. यावेळी, शाह यांनी 44,703 जणांना सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले.

दरम्यान, शाह यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस अत्यंत नकारात्मक वृत्तीचे राजकारण करत असल्याचे शाह यावेळी म्हणाले.

या नकारात्मक वृत्तीनेच काँग्रेस नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे, असेही ते म्हणाले. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात 300 हून अधिक जागा जिंकेल, तर काँग्रेस (Congress) विरोधी पक्षाचा दर्जाही गमावेल, असे जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले.

शाह पुढे म्हणाले की, 'नकारात्मकतेच्या राजकारणामुळे काँग्रेस नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी सबब पुढे करत बहिष्कार टाकत आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'अशी उदाहरणे काँग्रेस आणि विरोधी शासित राज्यांमध्ये समोर आली आहेत, जिथे राज्यपाल, संबंधित मुख्यमंत्र्यांऐवजी सोनिया गांधी-राहुल गांधी यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी नवीन संमेलनांचे उद्घाटन केले आहे.'

दुसरीकडे, शाह यांनी काँग्रेसच्या राजवटीची आठवण करुन देत म्हटले की, काँग्रेसच्या काळात पंतप्रधानांना संसदेत बोलू दिले जात नव्हते. मात्र, भारतीय जनतेने हा अधिकार पंतप्रधान मोदींना दिला आहे.

तसेच, 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार 1 लाख सरकारी नोकऱ्या देईल, असे आश्वासन भाजपने आसामच्या जनतेला दिले होते, असेही शहा म्हणाले.

अवघ्या अडीच वर्षांत सरकारने (Government) 86 हजार सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. उर्वरित नोकऱ्या येत्या 6 महिन्यांत देण्यात येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com