PM Modi Dainik Gomantak
देश

UPSC Result 2023: 'मी तुमची निराशा समजू शकतो....', पीएम मोदींनी असफल उमेदवारांना दिले प्रोत्साहन

UPSC Civil Services Exam Result: UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. यावेळी 933 उमेदवारांना यश मिळाले.

Manish Jadhav

UPSC Civil Services Exam Result: UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (आज) जाहीर झाला. यावेळी 933 उमेदवारांना यश मिळाले. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. दुसरीकडे, ज्यांना अपयश आले त्यांना पंतप्रधान मोदींनी प्रोत्साहन दिले.

दरम्यान, यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नागरी सेवा परीक्षेत (Exam) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा. देश सेवेची आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी या उमेदवारांना मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींनी अयशस्वी उमेदवारांना प्रोत्साहन दिले

दुसरीकडे, जे या परीक्षेत यश मिळवू शकले नाहीत, त्यांना पीएम मोदींनी प्रोत्साहन दिले. पंतप्रधानांनी सांगितले की, 'जे लोक नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत, त्यांची निराशा मी समजू शकतो. देश तुम्हाला कौशल्ये आणि सामर्थ्य दाखवण्याच्या अनेक संधी प्रदान करतो.'

इशिता किशोर टॉपर

इशिता किशोरने UPSC नागरी सेवा परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला. तर गरिमा लोहियाने दुसरा क्रमांक पटकावला. या परीक्षेत उमा हरती एन हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 933 यशस्वी उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिला आहेत.

त्याचबरोबर, टॉप 25 उमेदवारांमध्ये 14 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. UPSC परीक्षेसाठी 11 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर 2500 हून अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडण्यात आले. त्यापैकी 933 चा अंतिम निकाल लागला.

UPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट 'A' आणि गट 'B' मध्ये नियुक्तीसाठी एकूण 933 उमेदवार यशस्वी ठरले आहेत.

933 यशस्वी उमेदवारांपैकी 345 सामान्य श्रेणीतील, 99 EWS, 263 OBC, 154 SC, 72 ST प्रवर्गातील आहेत. या परीक्षेद्वारे IAS 180, IFS 38, IPS 200, केंद्रीय सेवा गट 'A' साठी 473 आणि गट 'B' सेवांसाठी 131 जागा भरल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT