UPSC Exam: भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर...

केंद्रीय लोकसेवा आयोगानं भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी Daf II जारी केला आहे.
UPSC Exam
UPSC ExamDainik Gomantak
Published on
Updated on

UPSC IFS मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी DAF II भरणं आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना मुलाखतीला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे मुख्य सेवा उत्तीर्ण झालेल्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं भारतीय वन सेवा मुख्य परीक्षेसाठी Daf II जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते यूपीएससीच्या (UPSC Official Website) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात.

UPSC IFS DAF II भरण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 असून या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. या परीक्षेसंदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच, 17 जानेवारी 2023 पूर्वी ऑनलाईन तपशीलवार अर्ज-II (DAF-II) मध्ये झोन/कॅडर्सच्या पसंतीचा क्रम अनिवार्यपणे भरला पाहिजे. यानंतर अर्ज वेबसाईटवर उपलब्ध होणार नाही.

UPSC Exam
Supreme Court: 'अल्पवयीन मुस्लीम मुलीला लग्नाची परवानगी देणारा पंजाब-हरियाणा HC चा निर्णय...'

तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरू शकता :-

  • फॉर्म भरण्यासाठी, सर्वात आधी अधिकृत वेबसाईट म्हणजेच, upsconline.in वर भेट द्या.

  • 'DAF for VARIOUS EXAMINATIONS OF UPSC’ and click on Indian Forest Service (Main) Examination, 2022 [ DAF-II ]' येथे क्लिक करा.

  • तिथे लॉगइन लिंक, रोल नंबर आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा.

  • भरलेला फॉर्म तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

  • तिथून DAF II भरा आणि सबमिट करा.

  • आता फॉर्मची प्रिंट आऊट घ्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com