PM Modi is seen picking up used bottles while inspecting the tunnel in video Video
देश

पंतप्रधान मोदींनी उचलला दिल्लीत नव्याने उदघाटन झालेल्या बोगद्यातील कचरा: Video

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी बोगद्याची पाहणी करताना वापरलेल्या बाटल्या उचलताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे आणि पाच अंडरपासचे रविवारी उद्घाटन केले. मात्र, यावेळी एक मनोरंजक दृश्य समोर आले. जेव्हा रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा पीएम मोदींनी स्वतः उचलला, रिकामी पाण्याची बाटली उचलण्यास सुरुवात केली तेव्हा सगळे अवाक झाले. त्यांचा व्हिडिओही सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदी हाताने काही कागदाचे तुकडे आणि जवळ पडलेली पाण्याची रिकामी बाटली उचलून फेरफटका मारताना दिसत आहेत. (PM Modi is seen picking up used bottles while inspecting the tunnel in video)

प्रगती मैदान एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्प हा प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संपूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीतून उभारलेल्या या प्रकल्पासाठी 920 कोटी रुपये खर्च आला आहे. प्रगती मैदानावरील कार्यक्रमांमध्ये अभ्यागत आणि प्रदर्शकांचा सहभाग सुलभ करण्यासाठी प्रगती मैदानावर विकसित होत असलेल्या नवीन जागतिक दर्जाच्या प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्रात सहज प्रवेश प्रदान करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या मुख्य बोगद्यासह पाच अंडरपासचे अनावरण केले. प्रगती मैदान इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य बोगदा रिंग रोडला पुराण किला रोड मार्गे इंडिया गेटला जोडतो. हा सहा लेनचा विभाजित बोगदा प्रगती मैदानाच्या प्रशस्त तळघर पार्किंगमध्ये प्रवेशासह अनेक उद्देशांसाठी काम करतो. या बोगद्याचा एक अनोखा घटक म्हणजे मुख्य बोगद्याच्या रस्त्याखाली दोन क्रॉस बोगदे बांधण्यात आले आहेत जेणेकरून वाहनतळाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत होईल.

हा बोगदा अग्निशामक व्यवस्थापन, स्वयंचलित ड्रेनेज, डिजिटली नियंत्रित सीसीटीव्ही आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीसह नवीनतम जागतिक मानक सुविधांनी सुसज्ज आहे. बहुप्रतिक्षित बोगदा भैरों मार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून काम करेल आणि भैरो मार्गावरील वाहतुकीचा भार अर्ध्याहून अधिक कमी करेल. या बोगद्याबरोबरच मथुरा रोडवर चार, भैरों मार्गावर एक आणि रिंगरोडवर एक असे सहा अंडरपास असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT