PM Modi in USA Dainik Gomantak
देश

PM Modi in USA: चर्चा, मोदींनी जिल बायडेन यांना दिलेल्या हिऱ्याची होतेय; पण, सुंदर पिचाई यांनी भारताला दिलेले 'GIFT' गेमचेंजर ठरणार

Sundar Pichai: यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अ‍ॅमेझॉनचे अँड्र्यू जेसी आणि बोईंगचे सीईओ डेव्हिड एल. कॅल्हॉन यांचा समावेश होता.

Ashutosh Masgaunde

Gujarat International Finance Tec-City:

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच पार पडला. यावेळी गूगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याबरोबर भेट झाली. या भेटीत पिचाई यांनी गुजरात, गांधीनगरमधील GIFT City ( Gujarat International Finance Tec-City) मध्ये 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पिचाई यांचे हे गुंतवणुकीचे 'गिफ्ट' भारतातील विविध क्षेत्रांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे. यादरम्यान परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी पीएम मोदींसाठी स्टेट लंचचेही आयोजन केले होते, ज्यामध्ये अमेरिकन सरकारशी संबंधित लोकांव्यतिरिक्त मोठ्या कंपन्यांचे सीईओ देखील सामील होते.

यामध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अ‍ॅमेझॉनचे अँड्र्यू जेसी आणि बोईंगचे सीईओ डेव्हिड एल. कॅल्हॉन यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीत भारतातील गुंतवणुकीबाबत सगळ्यांनीच चर्चा केली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतात 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनने आपली गुंतवणूक 26 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. अशा परिस्थितीत, या अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक भारतात नोकऱ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, जी वाढत्या बेरोजगारीशी झगडणाऱ्या देशासाठी मोठा दिलासा ठरू शकते.

सुंदर पिचाई यांची मोठी घोषणा

पीएम मोदींसाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान, सुंदर पिचाई म्हणाले की, गूगल भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये 10 अब्ज डॉलर्स गुंतवत आहे. ते म्हणाले की, आम्ही आज GIFT सिटी गुजरातमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.

Amazon 26 अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करणार

याशिवाय अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँड्र्यू जेसी यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की आम्ही भारतात कुटीर आणि लघु उद्योगांना आधीच प्रोत्साहन देत आहोत आणि आतापर्यंत सुमारे 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ते म्हणाले की आता आम्ही लवकरच भारतात आणखी 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत आणि भारतातील आमची एकूण गुंतवणूक 26 अब्जांवर नेणार आहोत.

अमेरिकेलाही मोठा फायदा

या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, आम्ही दोन महान राष्ट्रे, दोन महान मित्र, दोन महान शक्ती आहोत ज्या 21 व्या शतकाची दिशा ठरवू शकतात.

या दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी केलेले अनेक करार दर्शवतात की आमची भागीदारी किती व्यापक झाली आहे. या नात्याचे परस्पर फायदे आम्हाला दिसत आहेत. एअर इंडिया २०० बोईंग विमाने खरेदी करत आहे, त्यामुळे अमेरिकेत दहा लाख रोजगार निर्माण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT