PM Modi In France Dainik Gomantak
देश

PM Modi In France: "आपण जिथे जातो तिथे मिनी इंडिया तयार करतो..." पंतप्रधानांच्या पॅरिसमधील भाषणातील दहा मुद्दे

PM Modi Speech In Paris: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फ्रान्स दौऱ्यात पॅरिसमधील ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले.

Ashutosh Masgaunde

PM Modis France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांनी सर्वप्रथम ला सीन म्युझिकलमध्ये पोहोचून भारतीय समुदायातील लोकांना संबोधित केले.

भारतीयांना संबोधित करताना मोदींनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मोदींच्या भाषणात फ्रान्सचा राष्ट्रीय दिन, G20, चांद्रयान-3 लाँच आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी लाँग टर्म पोस्ट स्टडी व्हिसा यासारख्या गोष्टींचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळ भाषेला भारतातील सर्वात जुनी भाषा म्हणून गौरवले. 14 जुलै रोजी मोदी फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जाणून घेऊया पीएम मोदींच्या भाषणातील 10 मोठ्या गोष्टी

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पीएम मोदी यांचे स्वागत केले.

1. आपण जिथे जातो तिथे मिनी इंडिया तयार करतो

भारतीयांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, आजचे दृश्य आश्चर्यकारक आहे, हा उत्साह अभूतपूर्व आहे. आपण भारतीय कुठेही जातो, तेथे आपण एक मिनी इंडिया तयार करतो.

काही लोक 12 तासांचा प्रवास करून इथे आले आहेत, यापेक्षा मोठे प्रेम काय असू शकते. येथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

2. यावेळची माझी फ्रान्स भेट खास

भारतीयांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, यावेळी माझे फ्रान्समध्ये येणे अधिक विशेष आहे, आज फ्रान्सचा राष्ट्रीय दिन आहे, मी येथील लोकांना शुभेच्छा देतो.

पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी आल्या. मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राष्ट्रीय दिनाच्या परेडचा भाग असणार आहे.

हे स्नेहसंबंध केवळ दोन देशांच्या नेत्यांमधील नसून भारत आणि फ्रान्स यांच्यातील अतूट मैत्रीचे ते प्रतिबिंब आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ लिजन ऑफ ऑनर प्रदान केला.

3. संपूर्ण G20 भारताच्या क्षमतेकडे पाहतोय

यावेळी भारत G20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सध्या G20 चे अध्यक्ष आहे.

एखाद्या देशाच्या अध्यक्षतेखाली हे पहिल्यांदाच घडत आहे की त्या देशाच्या कानाकोपऱ्यात २०० हून अधिक मिटींग्ज होत आहेत. संपूर्ण G20 गटाचे भारताच्या क्षमतेकडे लक्ष आहे.

4. भारत आणि फ्रान्समधील परस्पर संबंध

पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्समधील मैत्रीचा भारतीयांसमोर उल्लेख केला. ते म्हणाले की, दोन्ही देशातील लोकांमधील संपर्क आणि दोन्ही देशांतील लोकांमधील परस्पर विश्वास हा या भागीदारीचा सर्वात मजबूत पाया आहे.

येथे नमस्ते फ्रान्स महोत्सव भरवला जातो आणि भारतातील लोक बोन्सू इंडियाचा आनंद घेतात.

ला सीन म्युझिकलमध्ये उपस्थि भारतीय समुदायातील लोक.

5. तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तामिळ भाषेवर भर दिला. ते म्हणाले की, भारताच्या विविध कानाकोपऱ्यात सुमारे 100 भाषा शिकविल्या जातात.

तमिळ भाषा ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. जगातील सर्वात जुनी तमिळ भाषा ही भारताची भाषा आहे, भारतीयांची भाषा आहे याचा यापेक्षा मोठा अभिमान काय असू शकतो.

6. 42 कोटी देशवासीयांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले

पंतप्रधानांनी भारतातील गरिबीच्या आकडेवारीसाठी संयुक्त राष्ट्राच्या अहवालाचा हवाला दिला. पंतप्रधान म्हणाले की, यूएनच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, अवघ्या 10-15 वर्षांत भारताने सुमारे 42 कोटी देशवासीयांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे.

हे संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा ते अधिक आहे.

ला सीन म्युझिकलमध्ये भारतीय समुदायातील लोकांना अभिवादन करताना पीएम मोदी.

7. चांद्रयान-3

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकलमध्ये उपस्थित भारतीयांसमोर चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले की, भारतात चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी काउंडडाउन सुरु आहे. भारतातील श्री हरिकोटा येथून हे ऐतिहासिक प्रक्षेपण काही क्षणात होणार आहे.

8. भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारतीयांना सांगितले की, आता तुम्ही भारतातही गुंतवणुकीसाठी पूर्ण उत्साहाने पुढे यावे.

भारत पुढील 25 वर्षात विकासाच्या ध्येयावर काम करत आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या भारतातील शक्यतांचा शोध घ्या.

तुम्ही भारतात गुंतवणूक करावी. नंतर पीएम मोदींनी भारतीयांना सांगितले की मोदींनी सांगितले नाही ते नंतर बोलू नका. पंतप्रधानांनी हे सांगताच सभागृहात हशा पिकला.

9. भारतीय विद्यार्थ्यांना विशेष भेट

पंतप्रधान मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी खास भेटीचा उल्लेख केला. फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा दीर्घकालीन पोस्ट स्टडी व्हिसा देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

10. भारताचा UPI फ्रान्समध्ये

भारताचा UPI फ्रान्समध्ये वापरण्यासाठी करार झाला आहे; त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT