PM Modi @narendramodi
देश

India Pakistan Tension: म्हणे, S-400 सिस्टिम उद्ध्वस्त केली, पाकड्यांचं खोटं पुन्हा भारतानं पकडलं; PM मोदींनी फोटो केले शेअर

S-400 Missile System India: मंगळवारी (13 मे) पंतप्रधान मोदींनी त्याच हवाई संरक्षण प्रणालीसह स्वतःचा फोटो काढला आणि तो त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केला. या फोटोमध्ये, S-400 प्रणाली पंतप्रधानांच्या मागे उभी असल्याचे दिसत आहे.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवत चांगलीच जिरवली. दोन्ही देशात शनिवारी (9 मे) युद्धबंदी झाल्यानंतर सीमेवर काहीशी शांतता निर्माण झाली आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा उघडकीस आला आहे. खरं तर, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये हल्ल्यांची मालिका सुरु झाली, तेव्हा पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांनी भारताची हवाई संरक्षण प्रणाली S-400 नष्ट केली आहे. पण मंगळवारी (13 मे) पंतप्रधान मोदींनी त्याच हवाई संरक्षण प्रणालीसह फोटो काढला आणि तो त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केला. या फोटोमध्ये, S-400 प्रणाली पंतप्रधानांच्या मागे उभी असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा जगजाहीर झाला.

पाकिस्तानने काय दावा केला होता?

पाकिस्तानने भारताची (India) एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला होता. पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांच्या JF-17 लढाऊ विमानांनी आदमपूरमध्ये भारताची S-400 प्रणाली नष्ट केली, पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या फोटोत एस-400 प्रणाली पूर्णपणे ठीक दिसत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, घाबरलेल्या पाकिस्तानने एस-400 बाबत भारताविरुद्ध खोटे पसरवले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या प्रकारे दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी सरकारला धडा शिकवला, त्यानंतर सर्वत्र भारतीय लष्कराचे कौतुक होत आहे. भारताच्या तिन्ही सैन्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' पार पाडण्यासाठी समन्वय दाखवला. पाकिस्तानला (Pakistan) त्याची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय लष्कराची प्रशंसा केली जात आहे. मात्र भारताच्या तिन्ही सैन्यांमध्ये हा समन्वय कसा अधिक मजबूत झाला? खरं तर यामागील कारण म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद निर्माण करणे. या पदामुळेच तिन्ही सैन्य आपापसात मजबूत समन्वय प्रस्थापित करु शकले आणि शत्रूंना योग्य उत्तर देऊ शकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेप्रकरणी रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले; हणजूण पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

SCROLL FOR NEXT