PM modi  Dainik Gomantak
देश

भारताच्या कानाकोपऱ्यात पर्यटनाची ताकद - पंतप्रधान मोदी

सर्व तीर्थक्षेत्रांवर यात्रेकरू आणि पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढली

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि झारखंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक विकास कामांची उद्घाटने करत आहेत. या पार्श्वभूमीवर देवघरमध्ये 401 कोटी खर्चून बांधलेल्या विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवघरमधील एम्सशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 17 हजार कोटींचे अनेक प्रकल्प मंजूर केले. यावेळी झारखंडचे राज्यपाल, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार निशिकांत दुबे उपस्थित होते. (pm Modi Bihar Jharkhand visit Deoghar airport Aiims inauguration )

या दौऱ्यादरम्यान झारखंडमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात पर्यटन क्षेत्र खुप महत्त्वाचा असल्याचे म्हटले. तसेच भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पर्यटनाची ताकद अफाट आहे, भरपूर क्षमता आहे, ती वाढवण्याची गरज आहे. असे ही ते म्हणाले. तसेच ते म्हणाले की, काशीमध्ये विकासाला गती मिळाल्यापासून, बनारसला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत वाराणसीला तीन पट अधिक प्रवासी मिळाले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, आमच्या सरकारसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही 15 नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित केला आहे. धरती आबा बिरसा मुंडा यांचे सर्वोत्तम आणि आधुनिक संग्रहालय बनवण्याचा बहुमानही आम्हाला मिळाला आहे.

पर्यटन हा उद्योग म्हणून रोजगाराचे एक मोठे माध्यम

गेल्या काही वर्षांत आधुनिक सुविधांनी जोडलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेकरू आणि पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्याचा थेट फायदा तिथे राहणार्‍या लोकांना, जवळच्या लोकांना, जवळच्या जिल्ह्यातील लोकांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जगातील अनेक देशांमध्ये पर्यटन हे एक फायदेशीर उद्योग म्हणून रोजगाराचे एक मोठे माध्यम आहे.

आज संपूर्ण जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था केवळ पर्यटकांच्या जोरावर चालत आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पर्यटनाची ताकद अफाट आहे, भरपूर क्षमता आहे, ती वाढवण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT