पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे संबंधित क्षेत्रातील नेत्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. मात्र चार वर्षापूर्वी निधन झालेल्या आमदाराला पीएम मोदींच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामूळे या मृत आमदारांच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. हे निमंत्रण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. (Deceased Bihar MLA invited to pm modi function )
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय दौऱ्यावर बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचत आहेत. बिहार विधानसभेच्या शताब्दी समारोप समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान विधानसभेतही जाणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बिहारमधील आमदार, आणि माजी आमदारांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. तयारीच्या दरम्यान अधिकाऱ्यांनी मोठी चूक केली आहे, जी पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चर्चेचा विषय बनली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेल्या मृत आमदाराचे नाव अब्दुल पयामी आहे. अब्दुल त्यांनी 1980 च्या दशकात मधुबनीच्या लौकाहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. तरी ही या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याने माजी आमदार पायमी यांच्या कुटुंबीयांना आश्चर्य धक्काच बसला आहे.
देवघर येथील विमानतळाचे केले उद्घाटन
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडला पोहोचले. देवघर येथील विमानतळाचे उद्घाटन त्यांनी केले. विमानतळासोबतच त्यांनी 16,800 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, झारखंडमध्ये सध्या 2 विमानतळ आहेत, येत्या काळात ते 5 विमानतळांपर्यंत वाढवले जातील. गेल्या 8 वर्षात झारखंडमध्ये दररोज 1,500 प्रवासी येत असत, ही संख्या दररोज 7,500 प्रवासी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.