Airport Dainik Gomantak
देश

देशातील 13 विमानतळांच्या नावात होणार बदल, जाणून घ्या औरंगाबाद विमानतळाचे नाव

मोदी सरकार (Modi government) देशातील 13 विमानतळांची नावे बदलण्याच्या तयारीत आहे (13 Airport Renames). या यादीत महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचाही समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील विमानतळ, शहरे आणि ऐतिहासिक स्थळांची नावे बदलण्याची योजना सुरु झाली आहे. आता मोदी सरकार (Modi Government) देशातील 13 विमानतळांची नावे बदलण्याच्या तयारीत आहे (13 Airport Renames). या यादीत महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचाही समावेश आहे. याच्या एक दिवस आधी भाजपशासित आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील सर्व ठिकाणांची नावे बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या जाणार असून, सूचनांसाठी पोर्टलही तयार करण्यात येत आहे. (Plans are afoot to rename the country's airports, cities and historic sites)

औरंगाबादमध्ये असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) म्हणाले, ''विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयाकडे मी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हणून पाहतो. भारतातील 13 विमानतळांची नाव बदलण्यात येणार असून या विमानतळांच्या नवीन नावांवर मंत्रिमंडळ निर्णय घेईल.''

दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर आसाममधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक दिवस आधी ही माहिती दिली होती. नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी आसाममध्ये लवकरच एक पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये आसाममधील ज्या ठिकाणांची संस्कृती आणि सभ्यता दिसून येत नाही, त्यांची नावे बदलण्यासाठी सूचना मागवल्या जातील.

यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक भाजपशासित राज्यांमध्ये अनेक मोठ्या स्थानकांची आणि शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून गोंड राणी कमलापती स्थानक करण्यात आले आहे. पूर्वी पाटलपाणी रेल्वे स्थानकाचे नाव तंट्या मामा रेल्वे स्थानक असे करण्यात आले. यूपीमध्येही अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे. फैजाबाद जंक्शन स्थानकाचे अयोध्या कॅंट असे नामकरण करण्यात आले आहे. फैजाबाद जिल्ह्याचे नावही बदलून अयोध्या करण्यात आले आहे. आग्रासारखी इतर अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणीही भाजप नेत्यांनी मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT